Marathwada rain : आधीच पावसानं धुतलं, त्यात जायकवाडीचे तब्बल 18 दरवाजे उघडले, मराठवाड्यात पूरस्थिती
मराठवाड्यात आठही जिल्ह्यात सलग सात दिवस अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील तब्बल 25 लाख हेक्टवरील पिके पाण्याखाली गेलीत. मराठवाड्यातील तब्बल 7 लाख शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलंय. 25 लाख हेक्टरवर जवळपास 7 हजार कोटी रुपयांचे नुकसान झालंय.
औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. धरणाचा जलसाठा 95% झाल्याने गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडीचे सध्या 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने दरवाजे उघडण्यात येत आहेत. 10 हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
पुर्वानुभव पाठीशी धरुन गोदाकाठच्या गावात राहणा-या सर्व नागरिकांनी शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे. घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.
गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळून गावकऱ्यांची काळजी घ्यावी. कुठलीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना सतर्क राहून त्याबाबतच्या उपाययोजना त्वरेने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे.धरणाचा जलसाठा 95% झाल्याने गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी,पुर्वानुभव पाठीशी धरुन गोदाकाठच्या गावात राहणा-या सर्व 1/3 pic.twitter.com/4uGoODZzTV
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 29, 2021
गुलाब चक्रिवादळाचे आता राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48तास राज्यावर दिसतील. येत्या 24तासात,मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची पण शक्यता. मुंबई,ठाणे पण.विदर्भात प्रभाव कमी. उद्या उ कोकण व उ मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील -IMD pic.twitter.com/sb2syKG56i
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 28, 2021
मराठवाड्यावर आभाळ फाटलं
मराठवाड्यात आठही जिल्ह्यात सलग सात दिवस अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील तब्बल 25 लाख हेक्टवरील पिके पाण्याखाली गेलीत. मराठवाड्यातील तब्बल 7 लाख शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलंय. 25 लाख हेक्टरवर जवळपास 7 हजार कोटी रुपयांचे नुकसान झालंय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी झालंय. शेतीला अक्षरश: तळ्याचं स्वरुप आलंय. शेतातील पाण्याबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.
शेतीला तळ्याचं स्वरुप
अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी झालंय. लाखो हेक्टरवरील काढणीला आलेली पीकं पाण्याखाली गेलीत. शेतीला अक्षरश: तळ्याचं स्वरुप आलंय. शेतातील पाण्याबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. कधी नव्हे तो पाऊस बरसला, इतका बरसला की होत्याचं नव्हतं झालं, अशा भावना आज मराठवाड्यातील अनेक शेतकरी बोलून दाखवत आहे.
गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यावर आभाळ फाटल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यात पावसाने दाणादाण केली. गुलाबी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं. मराठवाड्यासह विदर्भ मुंबई कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.
जायकवाडी धरणाचे कधीही उघडणार
जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचलाय. जायकवाडी धरणात 96 हजार क्यूसेक पाण्याची आवक सुरु आहे. पाण्याची आवक अशीच राहिली तर अवघ्या काही तासात 100 टक्के धरण भरण्याचा अंदाज आहे. आज सायंकाळी किंवा दुपारनंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाचे चौदा दरवाजे उघडले
नांदेडमध्येही तुफान पाऊस झाला. अगदी चार-पाच दिवस नांदेडला पावसाने नको केलं. आज पाच दिवसानंतर नांदेडमध्ये सूर्यदर्शन झालं. पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी गोदावरी पात्रात आवक वाढलेली आहे. आवक वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे चौदा दरवाजे उघडले. नदीपात्रात 6262 क्युमेक्स वेगाने पाणी विसर्जित करण्यात आलं. जिल्ह्यातील खरीप, बागायती पिकांचे मोठे नुकसान झालंय.
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या दोन लोकप्रतिनिधींनी केली आहे. ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले अतोनात नुकसान झालंय. फक्त पिकच नाही तर शेती सुद्धा खरवडून गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे मराठवाड्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार प्रशांत बंब आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केली केली आहे.
हे ही वाचा :