साहित्यिकांच्या मेळ्यात वास्तवावर विचारमंथन, 41 व्या मराठवाडा साहित्यसंमेलनात कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन?

कोरोना काळानंतर यंदा प्रथमच औरंगाबादेतील संमेलनात मराठवाडा तसेच राज्यस्तरीय साहित्यिकांचा मेळा भरत आहे. त्यामुळे अनेक सामाजिक-राजकीय घडामोडींचा धांडोळा घेणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन या दोन दिवसांमध्ये करण्यात आले आहे.

साहित्यिकांच्या मेळ्यात वास्तवावर विचारमंथन, 41 व्या मराठवाडा साहित्यसंमेलनात कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन?
येत्या 25आणि 26 सप्टेंबर रोजी औरंगाबादेत मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 11:12 AM

औरंगाबाद:41 वे मराठवाडा साहित्य संमेलन (41th Matrathwada Sahitya Sammelan, Aurangabad) येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी औरंगाबादेत होऊ घातले आहे. कोरोना काळानंतर यंदा प्रथमच औरंगाबादेतील संमेलनात मराठवाडा तसेच राज्यस्तरीय साहित्यिकांचा मेळा भरत आहे. त्यामुळे आयोजकांनीही संमेलनासाठी अनेक सामाजिक-राजकीय घडामोडींचा धांडोळा घेणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन या दोन दिवसांमध्ये केले आहे. या कार्यक्रमांमध्ये ग्रंथ प्रदर्शन, प्रकट मुलाखत, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद, नाटक अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असेल, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेश करपे यांनी दिली.

उद्घाटनाला अशोक चव्हाणांची उपस्थिती

25 सप्टेंबर रोजी म्हणजेच संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी 9.30 वाजता 40 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे असतील.

पहिल्या दिवशी कविसंमेलन, परिसंवाद

शनिवारी दुपारी दोन ते पाच या वेळात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी तडेगावकर असतील. यात मान्यवर कवी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आदी विषयांवर विविध शैलीतील कविता सादर करतील. यानंतर पाच ते संध्याकाळी सात या वेळेत विचारवंत जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर आली आहे’ या विषयावर पहिला परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात ज्येष्ठ पत्राक रनंदकिशोर पाटील, संजय आवटे, अलका धूपकर, रवींद्र केसकर, वैजनाथ अनमूलवाड आदी सहभागी होतील. तर याच दिवशी दुसऱ्या सभागृहात ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर’ या विषयावर परिसंवादाचे दुसरे पुष्प गुंफले जाईल. यात दीपा क्षीरसागर, राम रौनेकर, रवींद्र बेंबरे, संजय जगताप आणि मोहीब कादरी हे सहभागी होतील. याच दिवशी रात्री 7 ते 9 दरम्यान ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाईल.

दुसऱ्या दिवशी, प्रकट मुलाखत आणि शेतकऱ्यांवरील परिसंवाद

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत रवींद्र तांबोळी, गजाजनन जाधव, पृथ्वीराज तौर घेतील. सकाळी साडे अकरा वाजता ‘आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारण्यांचा बळी’ या विषयावर तिसरा परिसंवाद घेतला जाईल. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील या परिसंवादात राजकुमार तांगडे, बालाजी मदन इंगळे, केदार काळवणे, नारायण शिंदे, कैलास तवार हे सहभागी होतील.

दुसऱ्या दिवशी कथाकथनाची मेजवानी

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. ना.गो. ललिता गादगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी लेखिका-कवयित्रींचे लेखन स्त्रीवादात अडकले आहे’ या विषयावर परिसंवाद होईल. यात भगवान काळे, समिता जाधव, योगिनी सातारकरपांडे, शिवराज गोपाळे, महेश मंगनाळे यांचा सहभाग असेल. तर दुपारी दीड ते साडेतीन या काळात दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होईल. यात राजेंद्र गहाळ, बबन महामुनी, शंकर विभुते, विलास सिंदगीकर आणि अनिता येलमटे यांचा सहभाग असेल. दुपारी चार वाजता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होईल.

इतर बातम्या- 

लिटफेस्टच्या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्य जगापुढे यावे; राज्यापालांच्या उपस्थितीत ग्लोबल लिटररी फेस्टिवलचे उद्घाटन

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे यांची नियुक्ती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.