रावसाहेब दानवेंच्या मनात 40 वर्षांपासून एकच सल, भागवत कराड यांना भर सभेत मिश्किल टोला, नेमकं काय म्हणाले ?
वनिर्वाचित राज्यमंत्री भागवत कराड यांची दानवे यांनी चांगलीच फिरकी घेतली. चाळीस वर्षात मला जेवढी फुले मिळाली नाहीत; तेवढे तुम्हाला चार दिवसात मिळाली, असा टोमना रावसाहेब दानवे यांनी कराड यांना लगावला. दानवे यांनी भागवत कराड यांची अशा खुमासदार शैलीत फिरकी घेतल्यामुळे कालच्या जनआशीर्वाद यात्रेच्या समारोप सभेची एकच चर्चा होत आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड शहरामध्ये काल (22 ऑगस्ट) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जनआशीर्वाद यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये जोरदार भाषण केलं. तसेच नवनिर्वाचित राज्यमंत्री भागवत कराड यांची दानवे यांनी चांगलीच फिरकी घेतली. चाळीस वर्षात मला जेवढी फुले मिळाली नाहीत; तेवढे तुम्हाला चार दिवसात मिळाली, असा टोमना रावसाहेब दानवे यांनी कराड यांना लगावला. दानवे यांनी भागवत कराड यांची अशा खुमासदार शैलीत फिरकी घेतल्यामुळे कालच्या जनआशीर्वाद यात्रेच्या समारोप सभेची एकच चर्चा होत आहे. (Minister of State Bhagwat Karad ridiculed by Raosaheb Danve in Aurangabad Janashirvada Yatra)
दानवेंनी काढली भागवत कराड यांची खोड
नव्याने मंत्री झालेल्या भाजप नेत्यांची संपूर्ण देशासह महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्र सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाजप अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत आहे. या यात्रेच्या माध्यामातून भाजप नेते लोकांशी संपर्क वाढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ही यात्रा भाजप नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. यात्रेच्या समारोपादरम्यान, दानवे यांनी मजेदार भाषण केले. त्यांनी या भाषणात आपल्याच पक्षातील भागवत कराड यांची फिरकी घेतली. “चाळीस वर्षात मला जेवढी फुले मिळाली नाहीत; तेवढे तुम्हाला चार दिवसात मिळाली,” असा टोमना रावसाहेब दानवे यांनी कराड यांना लगावला. तसेच पुढे बोलताना दानवे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
नरेंद्र मोदी यांच्या कामाचे केले कौतूक
सभेदरम्यान दानवे यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे असं सांगताना काँग्रेस मात्र एका कुटुंबाचा पक्ष आहे, असे दानवे म्हणाले. तसेच यावेळी रावसाहेब दानवे यांनी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला.
दानवेंच्या भाषणाचे लोक दिवाने
रावसाहेब दानवे यांच्या रांगड्या भाषणाची नेहमीच चर्चा होत आलेली आहे. मिश्किल भाष्य करुन विरोधकांवर वार करण्याच्या त्यांच्या शैलीचे नेहमीच कौतूक होत आले आहे. भाषणादरम्यान विनोद करुन सगळी सभा जिंगण्याच्या त्यांच्या कौशल्याची विरोधकसुद्धा वाहवा करतात. जनआशीर्वाद यात्रेच्या समारोपादरम्यान केलेल्या या भाषणामध्ये त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्याची खोड काढल्यामुळे दानवेंचे हे भाषण चर्चेचा विषय ठरले आहे.
इतर बातम्या :
(Minister of State Bhagwat Karad ridiculed by Raosaheb Danve in Aurangabad Janashirvada Yatra)