MNS: मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक

राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीनंतर दिली.

MNS: मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर,  पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक
14 डिसेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 2:20 PM

औरंगाबादः राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या (Marathwada Region) भेटीला येत आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaokar) यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली.

मुंबईत बैठक, राज्यभरात दौऱ्याचा निर्णय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज शुक्रवारी मुंबईत झाली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दुपारी दोन वाजता ही बैठक संपली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीत रणनिती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यांच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती, बाळा नांदगावकर यांनी दिली.

14 डिसेंबरला औरंगाबादेत पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईतील बैठकीनंतर पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे औरंगाबाद येथे येतील. अर्थात कोव्हिड संबंधी सर्व नियमांचे पालन करत, जेवढ्या कार्यकर्त्यांची परवानगी मिळेल, तेवढ्याच संख्येने कार्यकर्ते व नेते या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली. सकाळी दहा वाजता औरंगाबादमधील प्रमुख नेते, माजी नगरसेवक, सध्याचे नगरसेवक यांच्याशी पालिका निवडणुकांसदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होईल. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी पुणे येथे पोहोचतील. त्यानंतर कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही राज ठाकरे जातील, मात्र या दौऱ्यांच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नसल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

इतर बातम्या-

पैठणः ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती, किरणोत्सवाचा देखणा सोहळा

औरंगाबाद महापालिका मार्चपर्यंत काढणार 300 कोटींचे कर्ज, स्मार्ट सिटी प्रकल्पात हिस्सा टाकण्यासाठी मोठे पाऊल!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.