AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांचा ताफा तीनवेळा अडवला, मराठा आंदोलक आक्रमक; काय घडलं नेमकं?

साताऱ्यात आज कडकडीत बंद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या एसटी महामंडळ विभागाला सातारा पोलिसांनी कराड, सातारा, पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे साताऱ्यात प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागमार आहेत.

राज ठाकरे यांचा ताफा तीनवेळा अडवला, मराठा आंदोलक आक्रमक; काय घडलं नेमकं?
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2023 | 10:31 AM
Share

औरंगाबाद | 4 सप्टेंबर 2023 : मराठा आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही राज्यभर उमटत आहेत. आज तर राज्यातील अनेक जिल्ह्यात बंदही पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी व्यवहार बंद आहेत. तर अनेक ठिकाणी एसटीची वाहतूक ठप्प आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांचा जालन्यात जाण्याचा ओघ काही कमी होताना दिसत नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात येणार आहेत.

राज ठाकरे हे सकाळीच जालन्याकडे जायला निघाले. औरंगाबादला आल्यानंतर ते कारने जालन्याकडे जायला निघाले होते. यावेळी राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने सुरू होती. राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं समजताच या आंदोलकांना राज ठाकरे यांचा ताफा अडवला. राज ठाकरे यांनीही कारच्या खाली उतरून मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी आंदोलकांनी राज ठाकरे यांना निवेदनही दिलं. यावेळी आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली होती. राज ठाकरे यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पुन्हा त्यांचा ताफा राजापूरकडे रवाना झाला.

राजकारण्यांच्या नादी लागू नका

त्यानंतर पुन्हा दाभरूळ गावात मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना निवेदने दिली. पैठणच्या आडगाव जावळेतही त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यावेळी त्यांनी माईकवरून आंदोलकांशी संवाद साधला. मी घटनास्थळी गेल्यावर माझी भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या राजकारण्यांच्या नादी लागू नका. या लोकांना फक्त तुमची मते हवी आहेत, असंही ते म्हणाले.

रुग्णालयात जाणार

दरम्यान, राज ठाकरे अंबडमध्ये रुग्णालयात जाऊन जखमी मराठा आंदोलकांची विचारपूस करणार आहेत. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच त्यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहितीही घेणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे या ठिकाणी येत असल्याने या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज्यभरात निदर्शन, बंद

दरम्यान, राज्यात आज ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी निदर्शनेही करण्यात येत आहे. राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जालन्यातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आज महाविकास आघाडीचे आंदोलन करण्यात येणार आहे. कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सांगलीत कडकडीत बंद

सांगली जिल्ह्यातील अनेक गावात आज बंदची हाक देण्यात आली आहे. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, जत तालुक्यातील डफळापूर गावात बंदची हाक देण्यात आली आहे. तर जतमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीत उद्या मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडणार आहे. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.