AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायकः मोबाइलवर मुलगा काय पाहत होता कळलंच नाही, औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

15 वर्षाच्या मुलाने केलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर त्या मुलापर्यंत पोहोचायला पोलिसांना फार वेळ लागला नाही. मुलाच्या वडिलांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला.

धक्कादायकः मोबाइलवर मुलगा काय पाहत होता कळलंच नाही, औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र करुन मारहाण
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 11:34 AM
Share

औरंगाबादः मुलांच्या हातात मोबाइल असल्यावर ते त्यावर काय करतात, काय पाहतात, याची खबरदारी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे. अन्यथा कमी वयातच मुलं कुठल्या थरापर्यंत बिघडू शकतात, याचा दाखला देणारी घटना नुकतीच औरंगबाादेत  (Aurangabad crime)घडली. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 5 वर्षांच्या मुलीला सायकल खेळवण्याचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने आरोपी शोधणे सहज सोपे झाले. मुलाच्या वडिलांना हा प्रकार कळल्यानंतर हा प्रकार मोबाइलच्या अतिरेकी वापराने झाल्याचे उघडकीस आले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्हा उघड

सोमवारी 25 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे चार वाजता गारखेडा परिसरात ही घटना घडली. येथील एका अपार्टमेंटसमोर पाच वर्षांची लहान मुलगी सायकल खेळत होती. गारखेडा परिसरातच राहणारा 15 वर्षीय मुलगा तेथून फिरत होता. या चिमुकलीला एकटीला पाहून त्याची नियत फिरली. सायकल खेळण्याच्या बहाण्याने गोड बोलून त्याने मुलीला सायकलवर बसवले. शेजारच्या कॉलनीत नेले. तेथे उभ्या असलेल्या दोन वाहनांच्यामध्ये नेत तिच्यासोबत अश्लील चाळे सुरु केले. मात्र समोरून एक महिला येत असल्याचे पाहताच त्याने पळ काढला. हा विचित्र प्रकार झाल्याची जाणीव झाल्याने चिमुकली प्रचंड घाबरली होती. कसा-बसा हा प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला. वडिलांनी थेट पुंडलिक नगर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी याप्रकरणी रात्री सव्वा नऊ वाजता गुन्हा दाखल केला.

घडला प्रकार ऐकून मुलाचे वडील सुन्न

15 वर्षाच्या मुलाने केलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर त्या मुलापर्यंत पोहोचायला पोलिसांना फार वेळ लागला नाही. दरम्यान मुलाच्या वडिलांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी आधी आरोप टाळत प्रश्नांचा भडिमार सुरु केला. पण पोलिसांनी फुटेज दाखवताच त्यांनाही मोठा धक्का बसला. ते एकदम सुन्न झाले. कपाळाला हात लावला. काही वेळाने ते शांत झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अपहरण, अत्याचार व बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाअंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

इतर बातम्या-

15 नोव्हेंबरपासून शासकीय कार्यालयात नो लस नो एंट्री, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाचा इशारा

दामदुपटीचे अमिष दाखवून 5 लाख 64 हजार लाटले, तक्रार दाखल होताच पैसे रिफंड, औरंगाबाद सायबर पोलिसांचा दबदबा

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.