शरद पवार यांची तोफ धडाडणार, धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच हल्लाबोल; रडारवर कोण? मोदी की अजितदादा?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांची बीड येथे जाहीर सभा होत आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच शरद पवार यांची सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार यांची तोफ धडाडणार, धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच हल्लाबोल; रडारवर कोण? मोदी की अजितदादा?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 8:07 AM

बीड | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज बीडमध्ये येत आहेत. बीडमध्ये शरद पवार यांची मोठी सभा होणार आहे. अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच शरद पवार यांची ही सभा होणार आहे. त्यामुळे शरद पवार कुणावर निशाणा साधणार? अजित पवार गट की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार यांची ही मोठी सभा होणार आहे. या सभेला जवळपास 45 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. पवार यांच्या या सभेमुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठं आव्हान उभं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शरद पवार हे आज सकाळी 10 वाजता औरंगाबादहून बीडच्या दिशेने निघतील. दुपारी 12 वाजता ते बीडमध्ये पोहोचतील. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांची बीडच्या महालक्ष्मी चौकातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर ते माने चौकात सभा स्थळी येतील. त्यानंतर सभेला सुरुवात होणार आहे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. या सभेला 40 ते 45 हजार लोक उपस्थित राहणार आहे. तेवढी आसन व्यस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार यांची बीडमधील सभा अत्यंत भव्य होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडे यांना आव्हान?

धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्येच शरद पवार यांची सभा होत आहे. या सभेला 45 हजार लोक येणं ही धनंजय मुंडे यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भविष्यात मुंडे यांचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पवार यांची ही सभा म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची चाचपणी असल्याचंही सांगितलं जात आहे.

शरद पवार यांचे बॅनर्स, पण…

दरम्यान, बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी ही बॅनर्स लावले आहेत. शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत, असं मुंडे समर्थकांचं म्हणणं आहे. मुंडे यांच्या समर्थकांनी अजित पवार यांच्या समर्थनात आशीर्वाद द्या, अशा आशयाचे बॅनर्सही शहरभरात लावले आहेत. त्यावर शरद पवार यांचाही फोटो आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, शरद पवार यांनी कालच इतर गटांनी माझा फोटो वापरू नका, नाही तर मला कोर्टात जावं लागेल, असा इशारा दिला आहे.

मुंडेंना धक्का, खंद्या समर्थकाचा पवार गटात प्रवेश

परळी येथील बबन गीते यांचा आज शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. बबन गीते हे धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत. गीते यांच्या प्रवेशामुळे मुंडे यांना मोठा धक्का बसणार आहे. त्याशिवाय बीआरएसचे नेते शिवराज बांगर हेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.