औरंगाबाद महिला काँग्रेसमध्ये बदल, नवनियुक्त अध्यक्षांवर पदाधिकाऱ्यांची नाराजी, मुंबईला जाणार
औरंगाबादमधील महिला काँग्रेस अध्यक्षपदी नुकतीच नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र याविरोधात काँग्रेसमधील एक गट नाराज आहे.
औरंगाबादः जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. मात्र या निवडलेल्या अध्यक्षांबाबत इतर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. औरंगाबादमधील नुकत्याच झालेल्या एका बैठकीत शहर महिला काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्षांची बदली करण्यात आली आहे. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी अंली रमाकां वडे यांची तर जिल्हा महिला काँघ्रेसच्या अध्यक्षपदी हेमा पाटील यांनी युक्ती करण्यात आळी आहे. नुकत्याच प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. तर सीमा थोरात यांची वर्णी कार्यकारी समितीच्या सदस्यपदी लावण्यात आली आहे. नव्याने झालेल्या दोन्ही अध्यक्षांसंदर्भात उज्ज्वला दत्त यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
काँग्रेसच्या कार्यकारिणीत आणखी काय बदल?
शनिवारी शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सरचिटणीस अॅड सुनिता तायडे- निंबाळकर, सचिव मीनाक्षी बोर्डे-देशपांडे, सचिव सईदा नबी पठाण, सदस्या संगीता कांबळे यांना वगळले आहे. दुसऱ्या यादीत यांचा समावेश राहिल अशी शक्यता आहे. विद्यमान सरचिटणीस सरोज मसलगे पाटील व मृणालिनी देशपांडे यांची चिटणीसपदावर नियुक्ती केली आहे. सीमा थोरात यांची अलीकडेच शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. शहर अध्यक्षपदासाठी अनेक जणी इच्छुक होत्या. नव्याने झालेल्या दोन्ही अध्यक्षांसंदर्भात उज्ज्वला दत्त यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ज्या कधी गांधी भवनात दिसल्या नाहीत, त्यांची वर्णी एवढ्या महत्त्वाच्या पदांवर लावली आहे.
नाराज महिलांचा गट मुंबईला जाणार
शहर काँग्रेसमधील या नव्या बदलांमुळे काही महिला पदाधिकारी नाराज आहेत. या निवडीसाठी नेमके कोणते निकष लावले, हा सवाल विचारण्यासाठी तसेच आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्या मुंबईला जाणार आहेत. शनिवारी यासंदर्भात एक बैठक झाली. या बैठकीला सीमा थोरात, रेखा राऊत, सरोज जेकब, दीपाली मिसाळ, सुहासिनी घोरपडे, अनिता भंडारे उपस्थित होत्या.
इतर बातम्या-