Good News | औरंगाबादहून पुण्यासाठी आता रोज रेल्वे, रात्रीचा प्रवास, पहाटे स्टेशनवर उतरा!

औरंगाबादहून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स पाचच तासात प्रवाशांना पुण्यात नेऊन सोडत होत्या. रेल्वेना जास्त वेळ लागतो. त्यामुळे बहुतांश प्रवासी ट्रॅव्हल्सला प्राधान्य देतात.

Good News | औरंगाबादहून पुण्यासाठी आता रोज रेल्वे, रात्रीचा प्रवास, पहाटे स्टेशनवर उतरा!
आजपासून सुरु झालेल्या नांदेड पुणे रेल्वेचे आज औरंगाबादमध्ये दाखवून स्वागत करण्यात आले.
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 6:36 PM

औरंगाबादः नांदेड, परभणी, औरंगाबादहून (Aurangabad) आता पुण्यासाठी दररोज रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त औरंगाबादहून पुण्याला (Pune) जाणं-येणं करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पण औरंगाबादहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वेचा (Railway) प्रवास म्हणावा तितकचा सोयीस्कर नव्हता. त्यामुळे बहुतांश प्रवासी एसटी बस किंवा ट्रॅव्हल्सला प्राधान्य देतात. मात्र आता औरंगाबाद स्टेशनवरूनदेखील प्रवाशांना पुण्यासाठी सोयीची रेल्वे धावणार आहे. रात्री प्रवास करून पहाटे पुण्याला पोहोचता येईल. रेल्वेचा प्रवास सुरक्षित, आरामदायक आणि किफायतशीर असा मानला जातो. पुण्याला जाण्यासाठीचा रेल्वेचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत जास्त वेळखाऊ असला तरीही प्रवासाच्या वेळेनुसार ग्राहकांना कोणता पर्याय सोयीचा वाटतो, हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.

आजपासून नांदेड-पुणे एक्सप्रेस

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज दुपारी चार वाजता जालना रेल्वे स्टेशनवर उद्घाटन केले जाईल. नांदेड-हडपसर द्विसाप्ताहिक एक्सप्रेसचा विस्तार पुण्यापर्यंत करण्यात आला. ही रेल्वे रोज धावणार आहे. त्यामुळे औरंगाबाद, परभणी, नांदेडच्या प्रवाशांसाठी ही सुखद वार्ता आहे. बहुतांश ट्रॅव्हल्स रात्री धावतात. त्यामुळे या रेल्वेचा ट्रॅव्हल्सवर परिणाम होण्याची चिंता आहे.

रेल्वेची वेळ कशी?

  1. गाडी संख्या 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस : ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी 15.15 वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे पुणे रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 05.20 वाजता पोहोचेल.
  2.  गाडी संख्या 17629 पुणे ते नांदेड एक्स्प्रेस : ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून रोजी रात्री 21.35 वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.05 वाजता पोहोचेल.

तिकिटाचे दर कसे?

औरंगाबादहून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या रेल्वे तिकिटाचे दर पुढीलप्रमाणे-

  • स्लीपर- 265 रुपये
  • थर्ड एसी-705 रुपये
  • सेकंड एसी- 1 हजार रुपये
  • फर्स्ट एसी- 1 हजार 675 रुपये
  • औरंगाबादहून ट्रॅव्हल्सद्वारे पुण्यात जाण्यासाठी 500 ते 800 रुपये असे दर आकारण्यात येतात.

…तर ट्रॅव्हल्सचे दर कमी होतील?

औरंगाबादहून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स पाचच तासात प्रवाशांना पुण्यात नेऊन सोडत होत्या. रेल्वेना जास्त वेळ लागतो. त्यामुळे बहुतांश प्रवासी ट्रॅव्हल्सला प्राधान्य देत होते. आता नवी रेल्वे सुरु झाल्यामुळे ट्रॅव्हल्सचे तिकिट दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे मार्गावर जवळपास 47 बस, ट्रॅव्हल्सच जातात. पुणे विभागाच्या 36 बसफेऱ्या होतात. तर 6 शिवनेरी बस या मार्गावर धावतात.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.