Corona: विदेशातून आलेल्यांची माहिती कळवा,लसवंत नसलेल्या संस्थेला टाळे! औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
औरंगाबादः कोरोनाचा नव्या विषाणूचा फैलाव जगभरात होऊ लागल्यावर मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य केले आहे. ज्या संस्थेत लस न घेतलेले कर्मचारी आढळून येतील, त्या संस्थेला 50 हजार रुपये दंड लावला जाईल किंवा गरज पडल्यास संस्थेच्या […]
औरंगाबादः कोरोनाचा नव्या विषाणूचा फैलाव जगभरात होऊ लागल्यावर मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य केले आहे. ज्या संस्थेत लस न घेतलेले कर्मचारी आढळून येतील, त्या संस्थेला 50 हजार रुपये दंड लावला जाईल किंवा गरज पडल्यास संस्थेच्या कार्यालयाला कुपूलही ठोकावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
परदेशी प्रवास करून आलेल्या प्रवाशांचीमाहिती कळवा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
ओमिक्रॉन, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक
सविस्तर:https://t.co/KOOfVXUuZM pic.twitter.com/jJSu9gV6uX
— Collector & District Magistrate, Aurangabad (@DMAurangabadMH) November 29, 2021
20 दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्यांची माहिती कळवा
ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 20 दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती कळवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यात विमान प्रवासासाठी दोन डोस घेणे किंवा 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. विमान प्राधिकरणानेही लसीबाबत तपासणी करावी. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती विमान कंपन्यांशी संपर्क साधून जिल्हा प्रशासनास तत्काळ द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी यासंदर्भातली माहिती, 0240-2331077 किंवा मनपा कोरोना वॉर रुम 8945306007 वर द्यावी, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्थेला टाळे ठोका
एखाद्या संस्थेतील कर्मचाऱ्याने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले नसतील तर त्या संस्थेला 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल किंवा गरज पडल्यास अशा संस्थेच्या कार्यालयाला कुलूपही ठोकले जाईल. एक हजारापेक्षा अधिक उपस्थिती राहण्याची शक्यता असलेल्या कार्यक्रमांवर प्रशासनाची नजर असेल. घाटी रुग्णालयातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु करण्यात आली आहे.
इतर बातम्या-