Omicron Effect: विमान कंपन्या पुन्हा संकटात, प्रवासी घटले, औरंगाबाद-मुंबई इंडिगो विमानाच्या तिकिटात घट!
दिवसेंद्विस प्रवाशांची संख्या घटत असल्याने इंडिगोने औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या विमान तिकिटात कपात केली आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी दोन ते तीन हजार रुपयांतच विमानप्रवास उपलब्ध झाला आहे.
औरंगाबादः राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचे चित्र असताना प्रवासावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. ओमिक्रॉनच्या धास्तीने अनेकजण स्वतंत्र रितीने प्रवास करण्यावर भर देत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. दिवसेंद्विस प्रवाशांची संख्या घटत असल्याने इंडिगोने औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या विमान तिकिटात कपात केली आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी दोन ते तीन हजार रुपयांतच विमानप्रवास उपलब्ध झाला आहे.
ओमिक्रॉनच्या धास्तीने प्रवाशांत घट
औरंगाबादहून विमानाने मुंबईला प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र ओमिक्रॉनची धास्ती आणि प्रत्येकाची RTPCR चाचणी करण्यात येत असल्याने अनेकांनी स्वतःच्या वाहनाने मुंबईला जाणे पसंत केले आहे. यामुळे विमान प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. सध्याच्या स्थितीत विमानात निम्मेच प्रवासी असूनही एवढ्यावरच उड्डाण करण्याची वेळ विमान कंपन्यांवर आली आहे. आगामी काळात प्रवासी आणखी घटतील, या भीतीने इंडिगोने मुंबईच्या तिकिटात मोठी कपात केली आहे. यामुळे प्रवासी काही प्रमाणात वाढतील, अशी इंडिगो प्रशासनाला आशा आहे. मुंबईला जाण्यासाठी अनेकदा 10 हजारांपेक्षाही जास्त तिकिट मोजावे लागतात. आता मात्र हे तिकिट तीन हजार रुपयांपर्यंत घसरले आहे.
जिल्ह्यात गुरुवारी 16 कोरोना रुग्णांची भर
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही हळू हळू वाढताना दिसत आहे. गुरुवारी सङरात 14 तर ग्रामीण भागात दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात सध्या 61 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून गुरुवारी 12 रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. यातील दहा रुग्ण शहरातील तर दोघे ग्रामीण भागातील आहेत.
इतर बातम्या-