आधी चारित्र्यावर संशय, मग पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केले, अखेर औरंगाबाद सायबर क्राइमच्या जाळ्यात अडकला

महिला किंवा मुलींनी घाबरून न जाता निर्भिडपणे तक्रार करावी. लोक काय म्हणतील, या भीतीने चूप राहू नये. अशा प्रकारचा कुठलाही त्रास होत असल्यास तत्काळ सायबर पोलीसांना कळवावे, असे आवाहान पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आधी चारित्र्यावर संशय, मग पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केले, अखेर औरंगाबाद सायबर क्राइमच्या जाळ्यात अडकला
पत्नीचे खासगी फोटो व्हायरल करणाऱ्या पतीला औरंगाबाद पोलिसांची अटक
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 5:47 PM

औरंगाबाद: पत्नीशी वाद झाल्यानंतर तिचे अश्लील फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल करणाऱ्या पतीला औरंगाबाद सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून या इसमाने पत्नीचे खासगी फोटो बदनामीकारक मजकुरासह सोशल मीडियावर टाकण्याचे सत्र सुरु ठेवले होते. याविरोधात महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर औरंगाबाद सायबर पोलिसांनी (Aurangabad cyber police) तपास करत आरोपीला अटक केली आहे.

दोघांमधील वाद घटस्फोटापर्यंत गेलेला

या प्रकरणी पीडितेने 15 सप्टेंबर रोजी सायबर पोलिसात तक्रार दिली होती. तिचे लग्न झाले असून दोन मुले आहेत. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेतो व तिला मारहाण करतो, त्यामुळे सध्या माहेरी असल्याची माहिती पत्नीने दिली. तसेच न्यायालयात दोघांमधील घटस्फोटाचे प्रकरणही प्रलंबित असल्याचे पत्नीने सांगितले. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिचा पती कुटुंबियांसोबत काढलेले खासगी फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित करत अश्लील मजकुरासह प्रसारीत करत असल्याची तक्रार तिने केली होती.

पत्नीचे फोटो नातेवाईकांना पाठवत होता

दरम्यान, ‘माझ्या नातेवाईकांना माझाच पती सोशल मीडियावरून माझे खासगी फोटो पाठवत आहे’ अशी तक्रार संबंधित महिलेने केली होती. या तक्रारीनुसार, सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद, ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आळा होत. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी बारकाईने करत होते. या तपासात पीडितेचा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारीत करणारा तिचा पतीच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे औरंगाबाद सायबर टीमने पतीला ताब्यात घेतले.

म्हणे.. नांदायला यावे म्हणून असे केले

सायबर पोलिसांनी पतीला ताब्यात घेतल्यावर गुन्ह्याच्या अनुशंगाने चौकशी केली. मात्र पतीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. सायबर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध मिळालेले पुरावे समोर ठेवताच त्याने गुन्हा कबूल केला. तक्रारदार महिला माझी पत्नी असून तिने माझ्यासोबत संसार करावा व नांदायला यावे म्हणून असे प्रकार केले. तसेच तिला व तिच्या नातेवाईकांना अद्दल घडवण्यासाठी हे बदनामीविषयक फोटो टाकल्याचे पोस्ट केल्याचे सांगितले. सदर गुन्ह्यात 21 सप्टेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात आले असून त्याने गुन्ह्यासाठी वापरलेला एक मोबाइल जप्त करण्यात आला.

त्रास देणाऱ्यांची त्वरा करा तक्रार- पोलिसांचे आवाहन

सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर किंवा फोटो व्हायरल करून महिलांना त्रास देणारे अनेक प्रकार घडत असतात. मात्र अशा प्रकरणी महिला किंवा मुलींनी घाबरून न जाता निर्भिडपणे तक्रार करावी. लोक काय म्हणतील, या भीतीने चूप राहू नये. अशा प्रकारचा कुठलाही त्रास होत असल्यास तत्काळ सायबर पोलीसांना कळवावे, असे आवाहान पोलिसांकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या- 

औरंगाबाद मनपाची करवसुली कासवगतीनं, मागील पाच महिन्यात फक्त 15 टक्केच वसुली, थकबाकीचा आलेख चढताच!!

औरंगाबाद महापालिका देतेय QR कोड आधारीत कोव्हिड चाचणी अहवाल, वर्षभरातील 5 लाखांपेक्षा जास्त अहवाल उपलब्ध

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.