Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावरून आपल्याच सरकारला घेरले; म्हणाल्या, हिंमतीने…

मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. गेल्या 12 दिवसांपासून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवलं आहे. आता तर त्यांनी पाणी न घेण्याचा इशाराही दिला आहे. तसेच सलाईनही न लावण्याचा इशारा दिला आहे.

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावरून आपल्याच सरकारला घेरले; म्हणाल्या, हिंमतीने...
पंकजा मुंडेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 10:57 AM

धाराशीव | 9 सप्टेंबर 2023 : राज्यातील मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण 12व्या दिवशीही सुरू आहे. तर, आरक्षणासाठी मराठा आंदोलक अजूनही रस्त्यावर उतरलेले आहे. अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. बंदची हाक दिली जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे. हे वातावरण तापलेलं असतानाच आता मराठा आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट आपल्याच सकारला आरसा दाखवला आहे. हिंमतीने आरक्षणाचा निर्णय घ्या, असं आवाहनच पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला केलं आहे.

पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज धाराशीवमध्ये आली आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. हा संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण देऊ शकते. मराठा आरक्षणावर राज्य सरकार तोडगा काढू शकते. कोणाला किती आरक्षण द्यायचे? कुणाला आरक्षणात कसे बसवायचे? याचा आराखडा सरकारकडे असतो, त्यांनी विश्वासाने आणि हिंमतीने आंदोलकांशी चर्चा करुन आरक्षण द्यायला पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

शब्द नको, दिशाभूल नको

मराठा समाजाला आता शब्द नको आहे, दिशाभूल नको आहे. त्यांना ठोस आरक्षण हवे आहे. ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावू नका. कोणताही विरोध नाही, दोघात भांडणे लावून तिसरी माणसे गंमत पाहतील हे महाराष्ट्राला नको आहे, असं त्या म्हणाल्या.

तर देश पातळीवर मोठा निर्णय घ्यावा लागेल

50 टक्क्याच्यावर जायचे नसेल तर किती टक्के मराठा आरक्षण बसते ते त्यांना दिले पाहिजे. केंद्र सरकारच्या अडचणी वेगळ्या असतील. अनेक राज्यात आरक्षणाचा असाचा प्रश्न आहे. त्याकडेही केंद्र सरकारला पाहायचे आहे. केंद्राने काय करावे हे संविधान पाहून करतील. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा न्यायची असेल तर तो देश पातळीवरील मोठा निर्णय घ्यावा लागेल, असं पंकजा म्हणाल्या.

तर तु्म्ही लढवय्ये नाही

यंत्रणेचा जीव आंदोलन करुन घ्या मात्र स्वतःचा जीव देऊ नका. आत्महत्या करू नका. आत्महत्या करावीशी वाटत असेल तर तुम्ही लढवाय्ये नाहीत, तुमची ही लढाई येणाऱ्या पिढीच्या कामाला येत असते, असंही त्यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.