औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच!!
ज्या खेळासाठी संबंधित खेळाडू येतो, त्याला त्या मैदानावर प्रवेश मिळवण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. शुल्क भरणाऱ्यांचीच याच नोंद होणार असल्याने फुकट्यांवर चाप बसणार आहे.
औरंगाबादः शहरातील गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर पहाटेपासूनच अनेक नागरिकांची गर्दी होत असते. यात वार्षिक वर्गणीदार तसेच शुल्क न भरता येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मात्र आता खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तसेच संकुलाचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रवेशद्वारापासून प्रत्येक खेळाच्या मैदानांच्या एंट्री गेटवरच खेळाडूंची डिजिटल तपासणी होणार आहे. त्यानंतरच खेळाडूंना आत प्रवेश मिळेल. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी मंगळवारी क्रीडा संकुलाची पाहणी केली.
वर्गणीदारांनाच प्रवेश मिळणार
विभागीय क्रीडा संकुलात पहाटेपासून वार्षिक वर्गणीदार येत असतात. यात शुल्क न भरताच येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये, तसेच क्रीडा संकुलाच्या उत्पन्नातही वाढ व्हावी, यासाठी प्रत्येकांना क्यू आर कोडचे पास देण्यात येणार आहेत. यात वाहनांनाही हे पास दिले जाणार आहेत. तसेच ज्या खेळासाठी संबंधित खेळाडू येतो, त्याला त्या मैदानावर प्रवेश मिळवण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. शुल्क भरणाऱ्यांचीच याच नोंद होणार असल्याने फुकट्यांवर चाप बसणार आहे.
खेळाडूंच्या सुविधा वाढवणार
संकुलात येणाऱ्या खेळाडू किंवा वर्गणीदारांना सध्या कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात नाही. मात्र आता खेळाडूंसाठी क्रीडा संकुलातच दर्जेदार कँटीनही सुरु केले जाणार आहे. तसेच इतर सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल. चांगले प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांसह संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, मार्गदर्शक सचिन पुरी यांचीही उपस्थिती होती.
इतर बातम्या-