औरंगाबादः वैजापुरातील पालखेड यात्रेतील शंकरपट उधळला, 26 जणांवर गुन्हे, 31 लाखांचा माल जप्त !
वैजापूर तालुक्यातील पालखेडमधील पारेश्वर येथे सध्या पारेश्वर महाराज यात्रा सुरु आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कऱण्यात येतात. पोलिसांच्या उपस्थितीतही आयोजकांनी शंकरपट भरवण्याचे धाडस केले. त्यामुळे पोलिसांनीही इथे मोठी कारवाई केली.
औरंगाबादः वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील यात्रेनिमित्त बैलशर्यत (Bull race)अर्थात शंकरपट खेळणे काहींना महागात पडले. राज्य शासनाने शंकरपटावर बंदी घातलेली आहे. असे असूनही काही उत्साही लोक शंकरपट (Shankarpat) खेळताना आढळून आले. पोलिसांनी या शर्यती जिथे सुरु होत्या, तेथे जाऊन घोडे, बैल, टांगे असा 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 26 जणांविरुद्ध वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालखेडमधील पारेश्वर यात्रेत कारवाई
वैजापूर तालुक्यातील पालखेडमधील पारेश्वर येथे सध्या पारेश्वर महाराज यात्रा सुरु आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कऱण्यात येतात. यात्रेमुळे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या उपस्थितीतही आयोजकांनी शंकरपट भरवण्याचे धाडस केले. त्यामुळे पोलिसांनीही इथे मोठी कारवाई केली. पोलिसांनी या ठिकाणहून 18 घोडे, 18 बैल, टांगे आणि वाहन असा एकूण 31 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 26 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
बिडकीनमध्येही बैल शैर्यतीत 12 जण ताब्यात
औरंगाबादमधील बिडकीन येथेही पोलिसांनी बैल शर्यतीवर धडक कारवाई केली. मुख्य आयोजकांसह 12 जणांना याठिकाणाहून ताब्यात घेतले. तसेच लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जांभळी तांडा येथे काही लोक बैल शर्यत भरवत असल्याची माहिती खबरींकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रविवारी छापा मारून कारवाई केली. याठिकाणाहून बैल, टांगा, पिकअपसह 59 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
इतर बातम्या-