AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपला शेजारी खरा पहारेदार’, सुरक्षित दिवाळीसाठी औरंगाबाद शहर पोलिसांचे अभियान, नागरिकांसाठी काय आहेत सूचना?

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोसायट्या, अपार्टमेंट, बंगले, रो हाऊस या ठिकाणी जाऊन तेथील रहिवाशांसोबत बैठकीचे आयोजन पोलिसांनी करावे, अशा सूचना संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.

'आपला शेजारी खरा पहारेदार', सुरक्षित दिवाळीसाठी औरंगाबाद शहर पोलिसांचे अभियान, नागरिकांसाठी काय आहेत सूचना?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 12:50 PM
Share

औरंगाबादः दिवाळीच्या सुट्यांमध्ये (Diwali holidays ) अनेकजण बाहेरगावी जाण्याची योजना आखतात. अशा वेळी आपण गावी गेल्यावर आपल्या घराची राखण करणारा खरा पहारेकरी हा आपला शेजारीच असतो. याच तत्त्वानुसार औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) यंदाच्या दिवाळीनिमित्त ‘माझा शेजारी, खरा पहारेदार’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्ष नागरिक, सुरक्षित परिसर यावर जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यालयातील पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी दिली.

दिवसा रेकी, रात्री घरफोडीची शक्यता

दिवाळीनिमित्त शहरातील अनेक लोक बाहेरगावी जातात, काहीजण नातेवाईकांकडे जाऊन सण साजरा करतात. त्याचा फायदा घेत चोरटे दिवसा बंद घरांची रेकी करतात आणि रात्रीच्या वेळी घरफोड्या करु शकतात. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोसायट्या, अपार्टमेंट, बंगले, रो हाऊस या ठिकाणी जाऊन तेथील रहिवाशांसोबत बैठकीचे आयोजन पोलिसांनी करावे, अशा सूचना संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?

– दिवाळीसाठी बाहेर किंवा गावी जाणार असाल तर त्याची माहिती शेजाऱ्यांसह स्थानिक पोलिस ठाण्यात द्या. अशा भागात पोलीस गस्त वाढवतील. – बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या बंद घरातील मौल्यवान ऐवज रोकड, दागिने, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. – सोसायट्या, बंगले, रोहाऊस अशा ठिकाणी नाइट वॉचमन, सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा, योग्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, – सीसीटीव्ही बंद असल्यास दुरूस्त करून घेण्याबाबत सूचना संबंधितांना द्याव्यात.

पोलिसांसाठी उपायुक्तांच्या कोणत्या सूचना?

– पोलिसांनी सोसायट्या, संवेदनशील ठिकाण, फार्महाऊस येथे भेट पुस्तिका लावावी. – रात्री गल्तीवर असलेल्या अंमलदार, मार्शल यांनी भेट देऊन नोंद करावी. – सुरक्षा रक्षकांना संपर्क क्रमांक द्यावे. – गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग वाढवावी. – बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची जाण्याची-परतण्याची नोंद करून त्या ठिकाणी गस्त वाढवावी. – रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सतत चौकशी करा, प्रतिबंधात्मक कारवाई करा. – संवेदनशील ठिकाणी पेट्रोलिंग करून मोकळ्या मैदानात, आडबाजूला अंमलदार झोपलेले आढळणार नाही, याची दक्षता घ्या. – उपलब्ध मनुष्यबळापैकी अधिक मनुष्यबळाचा वापर करून अचानकपणे कुठेही नाकेबंदी करावी. नाकाबंदीदरम्यान संशयित वाहने व व्यक्तींची तपासावे, नाकेबंदी प्रभावीपणे राबवावी.

इतर बातम्या-

औरंगबाद जिल्ह्याला मिळणार सहा डायलिसिस युनिट, गरजू रुग्णांची सोय, घाटी रुग्णालयावरील ताण कमी होणार

जालनाः जाफराबादेत 9 चोरट्यांचा धुमाकूळ, घरात घुसून मुली व महिलांना मारहाण, दीड लाखांचे दागिने व मुद्देमाल पळवला

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.