Aurangabad: खासदारांनी स्वतःच्या निधीतूनच मराठी पाट्या लावाव्यात, शिवसेनेचा इम्तियाज जलील यांना टोला!
राज्यातील सर्व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय राज्य सरकारने घेतला. यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना, मनसे, एमआयएममध्ये चांगलीच जुंपली आहे.
औरंगाबादः राज्यातील सर्व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय राज्य सरकारने घेतला. यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना, मनसे, एमआयएममध्ये चांगलीच जुंपली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार निधीतून मराठी पाट्या लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा टोला शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
शिवसेनेची भूमिका काय?
मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून सर्व दुकानदारांनी स्वतःहून या आदेशाची अंमलबजावणी करावी, अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी दिला आहे.
इम्तियाज जलील काय म्हणाले?
महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषेतून पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. यावर एमआयएमचे खासदार इम्तिया जलील यांनी पाट्या लावण्यासाठी शासकीय निधी द्यावा, अशी मागणी केली आहे. यावर राजू वैद्य यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खासदारांचा निधीही शासकीय निधीच आहे. त्यांनी मराठीतून पाट्या लावण्यासाठी तो निधी वापरल्यास त्याचे स्वागतच होईल.
मनसेकडून सत्कार समारंभ
दरम्यान, ज्या व्यापाऱ्यांनी मराठी पाट्या लावल्या त्यांचा औरंगाबाद मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच मराठी पाट्यांची मागणी ही सर्वात आधी मनसेने लावून धरली असून महाविकास आघाडी किंवा शिवसेनेने याचे श्रेय लाटू नये, असा इशाराही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
इतर बातम्या-