जन्मजात दोष असलेल्या बालकांवरील शस्त्रक्रियांना कवच मिळण्याचे प्रयत्न, बाल शल्यचिकित्सा परिषदेत विचार

बालरोग तज्ज्ञांचे अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एक विमा कंपनी त्यासाठी तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची गरज असल्याचे इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जनच्या अध्यक्षांनी सांगितले.

जन्मजात दोष असलेल्या बालकांवरील शस्त्रक्रियांना कवच मिळण्याचे प्रयत्न, बाल शल्यचिकित्सा परिषदेत विचार
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 2:55 PM

औरंगाबादः मूल जन्मतःच आढळून येणाऱ्या बालकातील अनियमितता अथवा विकृतीवर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतो, मात्र अशा शस्त्रक्रियांचा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसतो. जन्मल्यावर अशा समस्या उद्भवू शकतात हे अनेकदा मूल गर्भातच असताना कळलेले असते. पण पुढचा खर्च झेपवणार म्हणून अनेक दाम्पत्य गर्भपाताचा निर्णय घेतात. अशा बालकांना आणि पर्यायाने शस्त्रक्रियांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गती देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले.

इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जनतर्फे आयोजित 47 व्या आयएपीएसकॉन-2021 या व्हर्चुअल राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भागवत कराड बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु आणि ज्येष्ठ पेडियाट्रिक सर्जन डॉ. स्नेहलता देशमुख यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती होती.

विमा कंपनीची कवच देण्याची तयारी

इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र रामदवार यांनी लहान बाळांच्या अशा शस्त्रक्रियांना कवच मिळण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न केले आहे. पेडियाट्रिक संघटनेनेही ही मागणी अनेक वर्षांपासून उचलून धरली होती. आता या प्रयत्नांना यश आले असून एक विमा कंपनी त्यासाठी तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची गरज असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. या परिषदेला संघटनेचे सचिव डॉ. रवी कनोजिया, सहसचिव डॉ. अमर शाह, डॉ. मंजूषा सेलूकर यांचीही उपस्थिती होती.

औरंगाबादेत आयुष रुग्णालयाची मागणी

औरंगाबाद शहरात आयुष रुग्णालयाची स्थापना व्हावी, यासाठी अनेक जण आग्रही आहेत. या मागणीसाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनवाल यांची भेट घेतली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या धर्तीवर औरंगाबादेत आयुष रुग्णालयाची स्थापना करण्याची मागणी केली. यावेळी नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचे अध्यक्ष वेंद्य जयंत देवपुजारी, आयुर्वेद व्यासपीठाचे वैद्य संतोष नेवपूरकर, उद्योजक राम भोगले उपस्थित होते.

इतर बातम्या-

येणार म्हणता म्हणता आलेच नाहीत, दरवर्षी नियोजन सांभाळणारे मंत्री कराड नेमके कुठे राहिले?

चांगल्या कामासाठी औरंगाबाद महापालिकेत योग्य उमेदवार निवडून द्या, डॉ. भागवत कराड यांचे औरंगाबादेत आवाहन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.