74 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळ्यासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांचे संचलन, उद्या सकाळी 9 वाजता ध्वजारोहण

मुख्यमंत्र्यांचा हा औरंगाबादेतील दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या विरोध केलाय.

74 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळ्यासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांचे संचलन, उद्या सकाळी 9 वाजता ध्वजारोहण
74 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्तासाठी औरंगाबादेत कडेकोट पोलिस बंदोबस्त
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 4:03 PM

औरंबागाद: 17 सप्टेंबर अर्थात 74 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरु आहे. या दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ), पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांची उपस्थिती राहिल. उद्या सकाळी 9 वाजता सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री शहरातील इतर नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहतील. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्याची मुख्य प्रशासकीय इमारत अर्थात विभागीय आयुक्तालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. औरंगाबादच्या दौऱ्यात मुख्यमंत्री शहरातील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन करतील तसेच पैठण येथील संतपीठाच्या उद्घाटनाची घोषणा करतील.

शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील विमानतळ, बाबा पेट्रोलपंप, सिद्धार्थ उद्यान, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आदी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. या दिवशी विविध राजकीय पक्षही आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलीस दलानेही काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेतलेली आहे.

दो गज की दूरी…मास्क है जरूरी

उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन करतील. सकाळी 9.25 वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कार्यक्रम स्थळी 400 च्या जवळपास खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या किंवा आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच या कार्यक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. वीस हजार चौरस फुटाच्या मंडपाची उभारणी केली असली तरी 200 लोकांनाच कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे.

राजकीय पक्षही आक्रमक

मुख्यमंत्र्यांचा हा औरंगाबादेतील दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी पुरवठा योजनेत औरंगाबादकरांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे शिवसेनेने शहरात केलेल्या सो कॉल्ड विकासकामांसाठी उपरोधिक पद्धतीने धन्यवाद आंदोलन करतील. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ते पुष्पवृष्टी करतील तसेच त्यांच्या आगमनाला तुतारीही वाजवली जाईल. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा औरंगाबादमध्ये अडवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा कोणत्याही परिस्थितीत अडवण्याचा निर्णय घेतल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. खासदार संभाजीराचे छत्रपती यांना राज्य सरकारानं दिलेली आश्वासन पूर्ण केली नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे. Preparation for Marathwada Mukti Sangram Din, Aurangabad

इतर बातम्या- 

Aurangabad Top 5: जाणून घ्या औरंगाबाद शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पाच बातम्या मोजक्या शब्दात

Aurangabad | बायको सरपंच असूनही नवराच मारतो शासकीय कागदपत्रांवर सह्या

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.