Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update: मराठवाड्यात पुन्हा पावसाची तुफान बॅटिंग; पैठण, पाचोड, करमाड परिसरात धुवाँधार

औरंगाबाद शहरात दुपारपासूनच ढगांचा गडगडाट सुरु होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच पैठण, पाचोड, सिल्लोड, करमाड भागातही धुवांधार पाऊस सुरु झाला.

Weather Update: मराठवाड्यात पुन्हा पावसाची तुफान बॅटिंग; पैठण, पाचोड, करमाड परिसरात धुवाँधार
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 6:10 PM

औरंगाबाद: हवामान विभागानं (Meterological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात पावसानं जोर पकडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी वातावरण काहीसं मोकळं असतं. सूर्यदर्शन झालं नाही तरी सकाळच्या वेळात पावसाना उघडीप घेतलेली असते. दुपारी चार वाजेनंतर मात्र औरंगाबादच्या ग्रामीण भागासह पाऊस चांगलाच जोर पकडत आहे. तेच सत्र आजही दिसून आलं.

शहर,परिसरात धुवांधार पावसाला सुरुवात

औरंगाबाद शहरात दुपारपासूनच ढगांचा गडगडाट सुरु होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच पैठण, पाचोड, सिल्लोड, करमाड भागातही धुवांधार पाऊस सुरु झाला. मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोलीसह उस्मानाभाग जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

जलाशयं भरली पण शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणीपातळीत वाढ झाली. मराठवाड्यातील बहुतांश धरणं भरत आली असली तरीही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्या काळात मराठवाड्यातील 7 जिल्ह्यातील तब्बल 145 मंडळात अतिवृष्टी झाली होती. काही दिवसांपूर्वी याच मंडळातील पिके ही पाण्याशिवाय गेली होती तर हंगामाच्या शेवटी अतिवृष्टीचा फटका सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. औरंगाबाद जिल्ह्यातील 44, जालन्यातील 15, बीडमधील 22, लातुर 7, उस्मानाबाद 1, नांदेड 31 तर परभणी जिल्ह्यातील 26 मंडाळात अतिवृष्टी झाली होती. आता या पुढील पावसाने शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात कुठे, कधी यलो अलर्ट?

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.  21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 22 सप्टेंबर रोजी बीड, परभणी, लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसण्याचे संकेत अर्थात यलो अलर्ट देण्यात आला आहे. ही माहिती डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.

इतर बातम्या-

साहित्यिकांच्या मेळ्यात वास्तवावर विचारमंथन, 41 व्या मराठवाडा साहित्यसंमेलनात कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन?

मराठवाड्यतील प्रकल्पांनी गाठली सरासरी, शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.