Raj Thackeray | शरद पवारांना हिंदू या शब्दाचीच अ‍ॅलर्जी, राज ठाकरेंचा पवारांवर हल्लाबोल

शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना शरद पवार यांनी कसा त्रास दिला, हे सांगताना राज ठाकरे म्हणाले,ज्या माणसाने शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले. त्यांच्या वृद्धापकाळात पवारांनी त्रास दिला. कशासाठी तर ते ब्राह्मण म्हणून... आम्ही जात मानत नाही. बघितली नाही. त्याच्याशी घेणं देणं नाही. मी व्यक्ती बघतो.

Raj Thackeray | शरद पवारांना हिंदू या शब्दाचीच अ‍ॅलर्जी, राज ठाकरेंचा पवारांवर हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 9:07 PM

औरंगाबादः शरद पवारांना (Sharad Pawar) हिंदू या शब्दाचीच अ‍ॅलर्जी आहे, त्यांनीच महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरलं, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत केला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसख्या जातीचा द्वेष सुरु झाला. मराठा बांधव भगिनी यांची माथी भडकवायचं काम राष्ट्रवादीनं केलं, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्राचा इतिहास (Maharashtra History) वाचा म्हणून मला सांगणाऱ्या पवारांनी मला सांगू नये. माझी जीवनगाथा हे प्रबोधनकारांचं पुस्तक वाचा. त्यांनी ख्रिश्चन मिशनरीला विरोध केला. महाराष्ट्रात नवरात्रोत्सव साजरा करणारे माझे आजोबा होते. त्यामुळे माझ्यावर दुही माजवण्याचा आरोप करू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

‘शिवाजी ज्यानं घरा-घरात पोहोचवला..त्याला यांनी त्रास दिला’

शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना शरद पवार यांनी कसा त्रास दिला, हे सांगताना राज ठाकरे म्हणाले, ‘उठ मराठ्या ऊठ या पुस्तकात प्रतापगडावरील संकट हे वाचा..महाराष्ट्रात विष या माणसाने कालवलं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीचा द्वेष सुरू झाला. मराठा बांधव भगिनी यांची माथी भडकवायची. जेम्स लेन सारखा माणूस उभा करायचा त्याने काही लिहिल्यावर त्यावरून माथी भडकवायची. ज्या माणसाने शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले. त्यांच्या वृद्धापकाळात पवारांनी त्रास दिला. कशासाठी तर ते ब्राह्मण म्हणून… आम्ही जात मानत नाही. बघितली नाही. त्याच्याशी घेणं देणं नाही. मी व्यक्ती बघतो. जात बघून पुस्तकंही वाचत नाही. रायगडावरील समाधी कुणी बांधली. ती लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांना काय तुम्ही ब्राह्मण म्हणून पााहणार का? टिळकांच्या पहिल्या वर्तमान पत्राचं नाव काय? मराठा. हे पवार साहेब कधी सांगणार नाही. आता जेम्स लेन खेचून आणायचा होता..’

‘पवारांना हिंदू या शब्दाची अ‍ॅलर्जी’

शरद पवारांना हिंदू या शब्दाचीच अ‍ॅलर्जी आहे, असा आरोप करताना राज ठाकरे म्हणाले, ‘ ज्यावरून दहा पंधरा वर्ष तुम्हा राजकारण केलं तो जेम्सलेन म्हणतो मी कुणालाही भेटलो नाही. तुम्ही केंद्रात होता. का त्याला फरफटत आणलं नाही? का महाराष्ट्राची डोकी फिरवलीत? कशासाठी हे विष पाजलं? नवीन वाद उकरून काढायचे.. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. तुम्ही रामदास स्वामींची जात पाहत आहात का? रामदास स्वामी कधी बोलेले मी शिवाजी महाराजांचा गुरु आहे  ? शिवाजी महाराज कधी बोलले रामदास स्वामी माझे गुरु आहेत का… मग कशासाठी..?  रामदास स्वामींनी जे शिवाजी महाराजांवर लिहिलं ते अप्रतिम आहे…एवढं सुंदर नातं मी कधी वाचलं नाही. मी इतकी वर्ष शिकलो. मला नाही आठवत कोणत्या शिक्षकाने माफी मागितली. यात माफी नाही प्रेम आहे. पवारांना हिंदू या शब्दाचीच मुळात अ‍ॅलर्जी आहे. प्रत्येक वेळेला बोलताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे… होय तो आहेच. पण त्याआधी तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले. पण कधीही पवार साहेबांच्या तोंडी कधी शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. मी बोललो तेव्हापासून ते शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत… असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.