पुरुषांना बांधून ठेवले अन् चौघांची वासना जागृत झाली, तोंडोळी दरोड्याची आपबिती, औरंगाबाद पोलिसांसमोर नवे आव्हान!

11 पथके दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना झाली. यात जालना, बीड येथील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांत पूर्वी काम केलेले व बदलून गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही तपासात सहकार्य घेतले जात आहे.

पुरुषांना बांधून ठेवले अन् चौघांची वासना जागृत झाली, तोंडोळी दरोड्याची आपबिती, औरंगाबाद पोलिसांसमोर नवे आव्हान!
पैठणमधील तोंडोळीत घटनास्थळाचा शोध घेणारे पोलीस पथक
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 10:54 AM

औरंगाबाद: डॉ. शिंदे यांच्या क्रूर हत्येतून सावरत असलेल्या औरंगाबादला बुधवारी उघड झालेल्या दरोड्याच्या घटनेनं पुन्हा हादरवलं. पैठण (Paithan) तालुक्यातील ताोंडोळी (Tondoli Robbery) भागातील शेतवस्तीवर मंगळवारी रात्री सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला केला. लुटीसाठी आलेल्या या दरोडेखोरांनी तेवढ्यावरच न थांबता, येथील माणसांवर पाशवी अत्याचार केले. वस्तीवरील पुरुषांना बांधून ठेवत दोन महिलांवर बलात्कार केला. तोंडोळी शेतवस्तीवर येण्याआधीही दरोडेखोरांनी लोहगावच्या एका शेतवस्तीवर  हल्ला करून तेथील रोकड लुटल्याचेही समोर आले आहे. तेथील पुरुषांनाही मारहाण केली. शहरातील उच्चभ्रू वस्तीतील अतिशय नियोजनबद्ध खूनाच्या घटनेचा औरंगाबाद पोलिसांनीही (Aurangabad police) तितक्याच शांततेत छडा लावला. आता पोलिसांसमोर आव्हान आहे ते औरंगाबाद-जालना परिसरातील ग्रामीण भागातल्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याचे! या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, औरंगाबादमध्ये एकानंतर एक घडणाऱ्या या धक्कादायक प्रकारामुळे (Aurangabad crime) ग्रामीण तसेच शहरी भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुरुषांचे हात-पाय बांधले

तोंडोळी येथील शेतवस्तीवर तीन महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कुटुंब राहण्यास आले होते. यात तीन पुरुष व चार महिला होत्या. दरोडेखोरांनी या कुटुंबावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. दरोडेखोरांनी कुटुंबातील पुरुषांना बाजूच्या खोलीत हातपाय बांधून कोंडले, तर बाहेर एकाच्या गळ्याला चाकू लावून चारपैकी दोन महिलांवर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. यातील पीडिता 31 आणि 32 वर्षीय असून, त्यांना दरोडोखोरांनी घराच्या बाजूला नेत अत्याचार केले. घरातील पुरुषांना शस्त्रांचा धाक दाखवून आधीच बांधून ठेवले हाेते त्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत. एकाने मुकाबला करण्याचा प्रयत्न केला असता त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. तोंडोळी येथील या घटनेत दरोडेखोरांनी रोख 36 हजार आणि बनावच दागिने लंपास केले.

पीडितांची प्रकृती स्थिर

दरम्यान तोंडोळी घटनेतील, दोन्ही पीडितांची घाटीत तपासणी करून प्राथमिक उपचार करण्यात आले. सदर घटना गंभीर असून पीडितांची प्रकृती स्थिर आहे. पीडितांवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले असून नियमानुसार सर्व अंगाने तपासणी करून सखोल अहवाल पोलिसांना देण्यात आल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले.

तपास पथके आता ग्रामीण भागात रवाना

डॉ. शिंदे यांच्या खून प्रकरणाचा छडा लावल्यानंतर औरंगाबाद पोलिसांतील तपास पथकांसमोर आता ग्रामीण भागातील शेतवस्त्यांवर सुरु असलेल्या हल्ल्यांचा तपास करण्याच आव्हान आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, पोलिस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, बिडकीनचे सहायक निरीक्षक संतोष माने हे अधिकारी रात्री उशिरापर्यंत बिडकीन येथे ठाण मांडून तपासावर लक्ष ठेवून होते. 11 पथके दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना झाली. यात जालना, बीड येथील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांत पूर्वी काम केलेले व बदलून गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही तपासात सहकार्य घेतले जात आहे.

दरोडेखोरांचे कपडे सापडले

दरम्यान, शेकटा रोडवरील शेतात पाण्याच्या हौदाजवळ मोबाइल, कुऱ्हाड, नकली सोन्याचे दागिने व दरोडेखोरांचे बदललेले कपडे आढळून आले आहेत.

सुलतानपूरवाडीत वृद्धाचा कान कापून लूट

तोंडोळीनंतर दरोडेखोरांनी लोहगावातील शेतवस्तीवर मारहाण करून लूटमार केली. तीन दुचाकींवर आलेल्या दरोडेखोरांनी जाताना येथील कुटुंबाची एक दुचाकीही नेली. या घटनेत लूटमारीपेक्षा पाशवी अत्याचाराच्या घटनेने सर्वांचा थरकाप उडाला. गेल्या काही दिवसांत दरोडेखोरांनी औरंगाबाद परिसरातील चार शेतवस्त्यांना लक्ष्य केले आहे. रविवारी रात्री चिकलठाणा, सुलतानपूरवाडीत तीन ते चार दरोडेखोरांनी दहशत माजवून लूट केली होती. इतकेच नव्हे तर शेतवस्तीवरील लोकांना बेदम मारहाणही केली होती. सुलतानपूरवाडीत तर एका वृद्धाचा कान कापून लूट केली होती, तर एका महिलेला बांधून दागिने ओरबाडले होते.

इतर बातम्या-

Aurangabad crime: आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या हाती, मोबाइल, जुगाराचे साहित्य अन् 89,300 रोख जप्त

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.