Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadabhau Khot: केतकीचा मला अभिमान, त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती?; सदाभाऊ खोत यांनी केलं समर्थन

Sadabhau Khot: सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का? देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती?

Sadabhau Khot: केतकीचा मला अभिमान, त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती?; सदाभाऊ खोत यांनी केलं समर्थन
NCP criticize Sadabhau Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 11:56 AM

उस्मानाबाद: अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) हिच्या शरद पवारांवरील (sharad pawar) पोस्टवर सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. मात्र, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केतकीच्या फेसबुक पोस्टचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचं समर्थन केलं आहे. केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं सांगतानाच तुम्ही केलं तर पाटलांच्या पोराने केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा हा प्रस्थापितांविरोधात आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केतकीचं जोरदार समर्थन केलं. सदाभाऊ खोत यांच्या या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का? देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली होती. त्यावेळी नैतिकता कुठे होती? अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाला टार्गेट करतात, त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का? स्वतःवर टीका केली की सगळे आठवते, अशी टीकाही त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

प्रस्थापितांचा वाडा पाडायचा आहे

प्रस्थापितांनी नेहमीच विस्थापितांवर अन्याय केला आहे. आम्हाला हा प्रस्थापितांच्या वाडा पाडायचा आहे. म्हणून आमचा लढा वाडा विरुद्ध गावरान आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी केलं म्हणून आम्ही करणार नाही. समोरून दगड येत असेल आणि ज्याच्या अंगावर दगड पडला तर त्याने काय गुहेत लपायचं का?, असा सवालही त्यांनी केला.

तिला मानावं लागेल

जहांगीरदारांनी गुन्हा केला तर त्याला माफ आणि इतरांनी काही केलं तर गुन्हा आहे. तिला मानावे लागेल. तिने कोर्टात स्वत:ची बाजू मांडली. तिच्या पोस्ट नंतर तुमच्या कार्यकर्त्यांच्या टीका टिप्पणी बघा. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं हे धंदे बंद करा, असा इशाराही त्यांनी दिला.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.