माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील: संजय राठोड
पूजा चव्हाण प्रकरणी वन मंत्रालयाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना आमदार संजय राठोड यांचं पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याचे संकेत मिळत आहेत. (sanjay rathod)
औरंगाबाद: पूजा चव्हाण प्रकरणी वन मंत्रालयाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना आमदार संजय राठोड यांचं पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसे संकेतच दिले आहेत. त्यावर संजय राठोड यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राठोड यांच्या कॅबिनेटमधील पुनरागमनावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. (sanjay rathod reaction on his come back in thackeray government)
संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबाबद्दल मला काही बोलायचं नाही. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, असं राठोड यांनी सांगितलं.
तुम्ही सामंतांनाच विचारा
उदय सामंत यांनी माझ्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत काही विधान केलं आहे. त्यांची प्रतिक्रिया मी ऐकली नाही. ते माझे स्नेही आहेत. ते बोलले. पण त्याबद्दल त्यांनाच अधिक विचारलं पाहिजे. मी काही बोलू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मी मंत्री व्हावा ही समाजाची इच्छा
तर राठोड यांचं पुनरागमन झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही. चित्रा वाघ यांची प्रतिक्रियाही मी पाहिली नाही. त्यामुळे मी त्याबद्दल बोलू शकणार नाही, असं सांगतानाच मी मंत्री व्हावा ही माझ्या समाजाची अपेक्षा आहे. पण मी विधिमंडळाचा सदस्य आहे, समाजाचे प्रश्न सोडवत राहीन, असं त्यांनी सांगितलं. (sanjay rathod reaction on his come back in thackeray government)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 July 2021 https://t.co/3tPv9V02EI #News #Bulletin #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 11, 2021
संबंधित बातम्या:
आमचं ठरलंय! विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार; आता पवारांचाही निर्वाळा
उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, संजय राठोडांबाबत योग्य तो निर्णय घेतील: संजय राऊत
(sanjay rathod reaction on his come back in thackeray government)