सर्वात मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?; शिंदे गटाच्या आमदाराने तारीखच सांगितली

आमचा उठाव झाला. तेव्हा मी प्रतिक्रिया दिली होती. उद्धव ठाकरे यांना मिसगाईड करणारे लोकं आहेत त्यामुळे शिवसेना संपत आहे. आजही तेच सुरू आहे. कोण बोलत आहे?

सर्वात मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?; शिंदे गटाच्या आमदाराने तारीखच सांगितली
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?; शिंदे गटाच्या आमदाराने तारीखच सांगितलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 11:44 AM

औरंगाबाद: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सहा महिने पूर्ण होत आहेत. या सहा महिन्यात एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार असल्याचं वारंवार सांगितलं गेलं. त्यामुळे अनेकांनी मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंगही सुरू केली. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही झालाच नाही. पण आता राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं नक्की झालं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही ठरली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगतानाच या विस्ताराची तारीखही सांगितली आहे.

संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली आहे. राज्यात आता मंत्रिमंडळाचा विस्तार करावाच लागणार आहे. येत्या 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत तांत्रिक अडचणी दूर होतील. त्यानंतर 20 ते 22 तारखेच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असा अंदाज संजय शिरसाट यांनी वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेवरही टीका केली. येत्या 8 ते 10 दिवसात शिवसेना रिकामी होणार आहे. शिवसेनेचे उरलेले आमदार 8 ते 10 दिवसात शिंदे गटात सामील होणार आहेत, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.

शिवसेनेत जो सकाळचा भोंगा सुरू आहे त्यामुळे शिवसेना रिकामी होणार आहे. भविष्यात निवडणुका लढवयाच्या की नाही असा प्रश्न उध्दव ठाकरे समोर उभा राहील, असं भाकीतही त्यांनी केलं आहे.

आमचा उठाव झाला. तेव्हा मी प्रतिक्रिया दिली होती. उद्धव ठाकरे यांना मिसगाईड करणारे लोकं आहेत त्यामुळे शिवसेना संपत आहे. आजही तेच सुरू आहे. कोण बोलत आहे? काय बोलत आहेत? त्यांना पक्षाशी काही घेणंदेणं नाही.

हे लोकं कोण आहेत? त्यांनी ग्राऊंडलेव्हलवर काम केलं आहे का? त्यांनी कधी ग्राऊंडलेव्हलची माहिती घेतली का? शिवसेना हा पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. पण उद्धव ठाकरे का गप्प आहेत हे कळत नाही, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही टीका केली. अंबादास दानवे हे संजय राऊतांचे शिष्य आहेत. त्यामुळे ते त्या भूमिकेत बोलतात. राऊत आणि त्यांचं बोलणं मॅच होण्यासाठी ते बोलत असतात, असा चिमटा त्यांनी काढला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.