डॉ. शिंदे खून: पत्नीच्या जबाबात विसंगती, असंख्य कॉल रेकॉर्ड्स पिंजून काढले, क्लू अजून दूरच…

डॉ. शिंदे यांच्या पत्नीच्या जबाबात हीच विसंगती पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक उस्मानाबादेत दाखल झाले आहे. विद्यापीठाच्या उपकेंद्रातील पहिल्यांदा संपर्क साधलेल्या व्यक्तीसह इतर सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले.

डॉ. शिंदे खून: पत्नीच्या जबाबात विसंगती, असंख्य कॉल रेकॉर्ड्स पिंजून काढले, क्लू अजून दूरच...
डॉ. शिंदेंच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा विहिरतही शोध घेण्यात आला.
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 5:21 PM

औरंगाबाद: डॉ. राजन शिंदे (Dr. Rajan Shinde Murder) यांच्या खून्याच्या तपासासाठी औरंगाबादमधील पोलिसांचे विशेष पथक (Special Police Team) तीन दिवसांपासून अहोरात्र मेहनत घेत आहे. हत्येला तीन दिवस उलटले तरीही पोलीस सबळ पुराव्यांअभावी आरोपींपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. दरम्यान हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि हत्याराने त्यावेळी घातलेले कपडे कुठे फेकून दिले असावेत, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधकार्य केले. तसेच डॉ. शिंदे यांच्या पत्नीने उस्मनाबाद उपकेंद्रावरून औरंगाबाद विद्यापीठात (Aurangabad University) बदलीची मागणी करण्यामागेही काय कारण असू शकते, याची चौकशी करण्यासाठी तसेच खूनाचे आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याची पाहणी करण्यासाठी पोलिसांचे विशेष चौकशी पथक उस्मनाबादेतही पोहोचले.

पुरावे शोधण्यासाठी विहिरीतही उतरले…

डॉ. शिंदे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकाने अग्निशमन दलाच्या मदतीने बुधवारी जोरदार अभियान राबवले. डॉ. शिंदे यांच्या घराच्या परिसरातील तीन विहिरींची तपासणी करण्यात आले. पहाटे साडेचार वाजताच घराच्या परिसरातून बाहेर पडलेल्या गाडीचे रस्ते तपासले. रस्त्यावरील दुभाजक, साइडच्या कचराकुंड्यांमध्ये हत्यार, कपडे टाकण्यात आले का, याचाही तपास पोलिसांनी केला. या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही मिळवले. विहिरीत गळ टाकून कपडे हत्यारांचा शोध घेतला. मात्र यातही पोलिसांना यश आले नाही.

4-5 डायऱ्यांतील लिखाणही तपासले

तपासातील एका निकटवर्तीयांनी लिहिलेले कथा-कादंबरीसदृश्य लिखाणही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात गेम सिनेमाच्या अनुशंगाने काही लिखाण आहे. तर काही काल्पनिक व दैनंदिन घडामोडी आहेत. याचीही तपासणी केली असता, त्यातही सुगावा सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष पथक उस्मानाबादेत, पत्नीच्या जबाबात विसंगती

डॉ. शिंदे यांच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (11 ऑक्टोबर) रोजी सकाळी 6.45 वाजता झोपेतून उठल्यावर पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर पोलिसांच्या जबाबातही त्या यावरच ठाम होत्या. मात्र त्यांच्या मोबाइलच्या सीडीआरमधून वेगळीच माहिती हाती लागली आहे. त्यांनी घटनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मनाबाद येथील उपकेंद्रातील एका सहकाऱ्याशी सोमवारी पहाटे 5.12 मिनिटांनी संपर्क साधून पतीचा खून झाला असून आज ड्युटीवर येणार नसल्याचे कळवले. त्यानंतर शेजाऱ्यासह इतरांशी 6 वाजेपूर्वीच अनेक कॉल केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉ. शिंदे यांच्या पत्नीच्या जबाबात हीच विसंगती पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक उस्मानाबादेत दाखल झाले आहे. विद्यापीठाच्या उपकेंद्रातील पहिल्यांदा संपर्क साधलेल्या व्यक्तीसह इतर सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले. त्यांच्या मोबाइलचे डिटेल्सदेखील ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर बातम्या-

प्राध्यापकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, औरंगाबादेत खळबळ, कुठून आलं इतकं क्रौर्य?

Aurangabad crime: सातारा परिसरात दिवसाढवळ्या घरं फोडली, लोको पायलट आणि इंजिनिअरच्या घरात चोरी, सीसीटीव्हीत चोरटे कैद 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.