औरंगाबादेत 22 ते 24 जानेवारी दरम्यान विश्व अहिराणी संमेलन, खान्देशी वैभवाचा इतिहास उलगडणार
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेच्या वतीने संमेलन ऑनलाइन पद्धतीने 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी आयोजित केले असून संमेलनाचे हे दुसरे वर्ष आहे.
औरंगाबादः अहिराणी भाषा संवर्धनासाठी दरवर्षी विश्व अहिराणी संमेलनाचे (Vishva Ahirani Sammelan) आयोजन करण्यात येते. यावर्षी जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेच्या वतीने संमेलन ऑनलाइन पद्धतीने 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी आयोजित केले असून संमेलनाचे हे दुसरे वर्ष आहे. यापूर्वी हे संमेलन ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे ठरले होते. मात्र कोरोना संसर्गाचा वेग आणि जिल्हा प्रशासनाने आखून दिलेले नियम पाहता हे संमेलन ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल, असा निर्णय संमेलनासाठी आयोजित बैठकीत घेण्यात आला.
खान्देशी इतिहास उलगडणार
अहिराणी भाषा ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत आ णि लगतच्या सीमावर्ती गुजरात, मध्यप्रदेश, मेळघाट जंगलातील लोक असे एक लाखाहून अधिक लोकांमध्ये बोलली जाते. मूळ गवळी लोक अहिराणी भाषा बोलतात. जगभरात विखुरलेल्या लोकांना या भाषेची श्रीमंती, संस्कृती, शब्दवैभव, शब्द सामर्थ्य, परंपरा यांची ओळख व्हावी म्हणून हे संमेलन एक दिशादर्शक ठरणार आहे.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पाटील
संमेलन ऑनलाइन पद्धतीने असल्याने आता जगभरातील साहित्यिक, लेखक, कवी, असे दिग्गज या संमेलनाला हजेरी लावणार आहेत. अहिराणी संमेलनाचे अध्यक्ष एस. के. पाटील तर स्वागताध्यक्ष म्हणून आमदार मंगेश चव्हाण हे असतील. या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन पोखराज पगारिया, प्रकाश बापट, मिलिंट पाटील, जितेंद्र देसले, संदीप भदाने, योगेश शिंदे आदींनी केले आहे.
इतर बातम्या-