अपघात पाहताच थांबले, जखमी मुलाचा चेहरा रुमालाने पुसला, औरंगाबादेत डॉ. कराड यांनी दिला माणुसकीचा दाखला

या अपघातात एका मुलाच्या तोंडाला मार लागला होता. केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. कराडांनी हात रुमालाने त्याचे रक्त साफ करून त्या मुलाला धीर दिला. त्यानंतर सर्व जखमींची शासकीय रुग्णालयात रवानगी केली आणि त्यानंतर डॉ. कराड पुढील प्रवासाला लागले.

अपघात पाहताच थांबले, जखमी मुलाचा चेहरा रुमालाने पुसला, औरंगाबादेत डॉ. कराड यांनी दिला माणुसकीचा दाखला
रविवारी औरंगाबादमध्ये रस्त्यावरील अपघात पाहताच डॉ. भागवत कराड यांनी तत्काळ अपघातग्रस्ताची मदत केली.
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 6:07 PM

औरंगाबादः कोणतीही मोठ्या पदावरील व्यक्ती त्या पदावर जाण्याऐवजी आधी माणूस असते. मग कितीही मोठे पद मिळाले तरी तिच्यातील माणुसकी जिवंत राहिली पाहिजे, असे नेहमी बोलले जाते. औरंगाबादेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनीही याचा दाखला दिल्याचे नुकतेच दिसून आले. आज रविवार 24 ऑक्टोबर रोजी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ (Aurangabad collector office) झालेला रस्त्यावरील अपघात पाहताच डॉ. भागवत कराड यांनी गाडी थांबवत आधी त्या अपघात ग्रस्ताची मदत केली. एवढेच नव्हे तर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केल्यावरच ते पुढील प्रवासाला निघाले. केंद्रीय अर्थराज्य मंत्रीपदावर पोहोचलेल्या डॉ. कराड यांनी आज माणुसकीचे दर्शन घडवून दिले. औरंगाबादमध्ये सध्या या दाखल्याचीच चर्चा सुरु आहे.

आपल्या रुमालाने पुसले जखमीचे तोंड

अपघात झाल्यावर सहसा कुणी थांबत नाही. पुढे होऊन मदत करत नाहीत. त्यातला कुणी नेता, राजकारणी किंवा महत्त्वाचा अधिकारी असेल तर त्याचा ताफा कधीही अशा ठिकाणी थांबत नाही. मात्र रविवारी डॉ. भागवत कराड यांनी मात्र आदर्श दाखला दिला. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्यावर झालेला रिक्षाचा अपघात पाहताच डॉ. कराड यांनी इतर गाड्या थांबवत आधी अपघात ग्रस्त रुग्णांची तपासणी केली. या अपघातात एका मुलाच्या तोंडाला मार लागला होता. त्यामुळे रक्तस्राव सुरु होता. अशा वेळी डॉ. कराडांनी हात रुमालाने त्याचे रक्त साफ करून त्या मुलाला धीर दिला. त्यानंतर सर्व जखमींची शासकीय रुग्णालयात रवानगी केली आणि त्यानंतर डॉ. कराड पुढील प्रवासाला लागले.

औरंगाबादचे ‘डॉक्टर’ कौतुकाचा विषय

डॉ. भागवत कराड हे राजकारणात येण्यापूर्वी डॉक्टर होते. त्यांच्या डॉक्टरकीच्या कारकीर्दीतील असंख्य उदाहरणे, असंख्य आठवणी सांगणारे लोक आज औरंगाबाद शहरात आहेत. अशा वेळी एक डॉक्टर या नात्याने डॉ. कराड यांनी केलेली अपघात ग्रस्ताची मदत हा आज औरंगाबाद शहरासाठी कौतुकाचा विषय ठरत आहे.

अपघातग्रस्तांची मदत करा, 5000 रुपये बक्षीस मिळवा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतीच ही योजना जाहीर केली आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालय-ट्रॉमा सेंटरमध्ये अपघाताच्या एक तास आधी पोहोचवल्याबद्दल बक्षीस दिले जाणार आहे. यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना एक वेळ मदतीसाठी 5,000 रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना 15 ऑक्टोबर 2021 ते मार्च 2026 पर्यंत चालेल.

इतर बातम्या-

पुणे पोलिसांच्या ‘सुरक्षित रिक्षा’ स्पर्धेला ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचं प्रत्युत्तर, थेट एक कोटींचं बक्षीस

पुण्यातला अपघात स्पॉट, नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल मार्ग बनला ‘डेथ झोन’, आतापर्यंत 56 जणांचा बळी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.