Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी मनपाकडे व्हॅक्सिनेटर्सचा तुटवडा, सध्याची केंद्रसंख्या अपुरी

पालिकेकडे व्हॅक्सिनेटर्स खूप कमी आहेत. सध्या महापालिकेतर्फे 45 केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. आणखी 20 व्हॅक्सीनेटर्स मिळाले तर 20 अतिरिक्त केंद्र सुरु करता येतील, असे महापालिकेचे नियोजन आहे.

Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी मनपाकडे व्हॅक्सिनेटर्सचा तुटवडा, सध्याची केंद्रसंख्या अपुरी
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 1:55 PM

औरंगाबाद: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार (Central Government) राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रात 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान लसीकरणाचा वेग वाढवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘कवचकुंडल’ या मोहिमेअंतर्गत स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर लसीकरण (Corona Vaccination) करण्याच्या सूचना शहरांना मिळाल्या आहेत. यानुसार राज्यात दररोज पंधरा लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेअंतर्गत निश्चित करण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिकेतही (Aurangabad Municipal corporation) या मोहिमेअंतर्गत लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

महापालिकेकडे लसीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा

लसीकरणाचे प्रमाण वाढावे, यासाठी महापालिकेने शहरातील चार आयुर्वेदिक महाविद्यालयांना पत्र लिहून व्हॅक्सिनेटर्सची मागणी केली आहे. तसेच घाटी रुग्णालय, एमजीएम रुग्णालयाच्या व्यवस्थापनालादेखील पत्र देवून व्हॅक्सिनेटर्स व डाटा एंट्री ऑपरेटर्सची मागणी केली आहे. मात्र त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पालिकेकडे व्हॅक्सिनेटर्स खूप कमी आहेत. सध्या महापालिकेतर्फे 45 केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. आणखी 20 व्हॅक्सीनेटर्स मिळाले तर 20 अतिरिक्त केंद्र सुरु करता येतील, असे महापालिकेचे नियोजन आहे. तसेच यासाठी दहा ते बारा एंट्री ऑपरेटर्सचीदेखील पालिकेला गरज आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

21 खासगी रुग्णालयांत मोफत लसीकरण:

धूत हॉस्पिटल, सिग्मा हॉस्पिटल, दरक हॉस्पिटल (सुराणानगर), कमलनयन बजाज, एशियन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल (आकाशवाणी चौक), एमआयटी (सिडको), हेडगेवार, मेडिकव्हर (चिश्तिया चौक), दहीफळे मल्टीस्पेशलिटी (अदालत रोड), स्वर्णीम (कांचनवाडी), इंडोवर्ल्ड (चौधरी कॉलनी, चिकलठाणा), ग्लोबल (सिल्कमिल कॉलनी), सोडाणी (एन-३), रोपळेकर (टिळकनगर), अजंठा (हडको कॉर्नर), पॅनसिया (समर्थनगर), सह्याद्री (चिकलठाणा), प्रोबस (बीड बायपास), स्वामी विवेकानंद सुपरस्पेशालिटी, अवधू्त हॉस्पिटल (सिडको एन ७), गोल्डन केअर हॉस्पिटल (शिवाजीनगर).

जिल्ह्यात शुक्रवारी 12 कोरोनाबाधितांची भर

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी 12 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात 17 जणांवर उपचार पूर्ण झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच शहरात सध्या 153 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शहरातील प्रमुख देवी मंदिरात कोरोना चाचणी

नवरात्रोत्सवात कर्णपुऱ्यासह शहरातील देवीच्या प्रमुख मंदिरांत भाविकांची गर्दी होत आहे.. त्यामुळे प्रमुख मंदिरांत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा यांनी दिली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. लसीकरण वेगाने करा, अशी सूचना या वेळी करण्यात आली. मनपाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली आहे. या अंतर्गत शहरातील 21 खासगी रुग्णालयांत आता मोफत कोविशील्ड लस मिळेल.

इतर बातम्या-

कोरोना रुग्णांमुळे पांगरीची शाळा बंद; सिन्नर, निफाड, येवल्यालात कडक निर्बंध लावण्याचा इशारा

पिंपरी-चिंचवडमध्ये 47 लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.