औरंगाबाद पोलिस दलात दिसणार ‘महिलाराज’, नव्या बदल्यांनुसार पाच प्रमुख पदावर महिला पोलिस अधिकारी

औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदी मोक्षदा पाटील यांची बदली झाली आहे. तसेच शर्मिला घार्गे या औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी असतील. तसेच राज्य गुप्तवार्ता विभागात मीना मकवाना या उपायुक्त पदावर असतील. उज्ज्वला वनकर आणि अपर्णा गीते या शहर पोलिस उपायक्तपदाची धुरा हाती घेतील.

औरंगाबाद पोलिस दलात दिसणार 'महिलाराज', नव्या बदल्यांनुसार पाच प्रमुख पदावर महिला पोलिस अधिकारी
Maharashtra police
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 5:34 PM

औरंगाबाद: गृहविभागाने गुरुवारी पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले. ऐन गणपती उत्सवाच्या मुहूर्तावर बदल्या झाल्यामुळे शहरात काही प्रमाणात खळबळ माजली. मात्र गृहविभागाने ( Home Affairs Ministry of Maharashtra) केलेल्या या  बदल्यांमध्ये औरंगाबाद शहरातील पाच महत्त्वाच्या पदांवर वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या पोलिसदलात नारीशक्तीचे दर्शन घडू शकेल, अशी चर्चा शहरात आहे.

कोणत्या पाच पदांवर महिला अधिकारी?

नव्याने झालेल्या बदल्यांनुसार, औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदी मोक्षदा पाटील यांची बदली झाली आहे. तसेच शर्मिला घार्गे या औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी असतील. तसेच राज्य गुप्तवार्ता विभागात मीना मकवाना या उपायुक्त पदावर असतील. उज्ज्वला वनकर आणि अपर्णा गीते या शहर पोलिस उपायक्तपदाची धुरा हाती घेतील.

ग्रामीण पोलिस अधीक्षक कोण?

औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पोलिस अधीक्षक पदावर मुंबई येथील पोलिस उपायुक्त निमित गोयल यांची बदली करण्यात आली आहे. तर मोक्षदा पाटील यांची बदली लोहमार्ग पोलिस अधीक्षक, औरंगाबाद विभागात करण्यात आली आहे. तसेच राज्यीतल पोलिस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. यात औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयातील मीना मकवाना आणि निकेश खाटमोडे पाटील यांचीही बदली करण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या जागी उज्ज्वला वनकर आणि अपर्णा सुधाकर गिते यांची नियुक्ती करण्यात आली.

निकेश खाटमोडे पाटील यांची बदली मुंबईत

शहर पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांची बदली पोलिस अधीक्षक, फोर्स वन, युसीटीसी मुंबई येथे करण्यात आली. तर मीना मकवाना यांची बदली, उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभागात करण्यात आली आहे. नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण पोलिस अधीक्षक अपर्णा सुधाकर गिते यांची शहर पोलिस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबाद गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त उज्ज्वला वनकर यांची बदली औरंगाबाद पोलिस उपायुक्त पदी करण्यात आली आहे.

रविंद्र साळोखे यांचीही बदली

दरम्यान, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर कार्यरत असलेले रविंद्र साळोखे यांचीही बदली करण्यात आली आहे. रविंद्र साळोखे यांची बदली पोलिस उप विभागीय पोलिस अधिकारी शाहुवाडी, कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांची बदली औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालय सहाय्यक पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे. (state government of Maharashtra order transfer of different police officers including Assistant Commissioner and Deputy Commissioner level officers)

इतर बातम्या- 

Aurangabad Alert: मिठाई खरेदी करताना सावधान, ट्रेवर Best Before Date लिहिलंय का पहा

Aurangabad Gold: ऐन सणातही सोन्याची लोळण, खरेदीचा विचार असेल तर गुंतवणुकीची हीच संधी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.