औरंगाबादेत उद्यापासून राज्य नाट्य स्पर्धेचा उत्साह, तापडिया रंगमंदिरात प्रयोगशील नाटकांची मेजवानी
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत एकूण 14 नाटकांची मेजवानी मिळणार आहे. कोरोना संकटामुळे प्रयोगशील कलाकारांना पाठबळ देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन मागील दोन वर्षांपासून थांबले होते.
औरंगाबाद| कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून खोळंबलेल्या राज्य नाट्य स्पर्धा (State level Drama Competition) पुन्हा एकदा सुरु होत आहेत. औरंगाबादमध्ये (Aurangabad) उद्यापासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात होत आहे. औरंगाबाद विभागातील 14 नाट्य प्रयोगांची ही स्पर्धा तापडिया रंगामंदिरात (Tapdiya Rangmandir) सायंकाळी 7 वाजेपासून सुरु होईल. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाने निवडलेले परीक्षक या नाटकांचे परीक्षण करतील. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या पुढाकारातून यंदा राज्य स्तरीय नाट्य स्पर्धांचे हे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय नाटकांचे यंदाचे हे 60 वे वर्ष आहे.
कोणती नाटके पहायला मिळणार?
औरंगाबादच्या तापडिया रंगमंदिरात उद्यापासून सुरु होणाऱ्या नाट्य स्पर्धांचे मुख्य समन्वयक म्हणून रमाकांत भालेराव हे काम पहात आहेत. स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांची नावं पुढील प्रमाणे-
-21 फेब्रुवारी- नरके टाकळी व्हाया स्वर्गारोहण- ले. राजकुमार तांगडे, दिग्दर्शन स्वप्निल पवार -22 फेब्रुवारी- ढग- अविनाश चिटणीस, शिवाजी मेस्त्री -23 फेब्रुवारी- देव चोरला माझा, सुमीत तौर, सिद्धांत पाईकराव -24 फेब्रुवारी- अण्णाच्या शेवटच्या इच्छा- विजयकुमार राख, रामेश्वर झिंजुर्डे -25- लिव्ह इन रिलेशनशिप- श्रुती वानखेडे, ऋषीकेश रत्नपारखी -28- आर यू व्हर्जिन- सतीश लिंगडे -1- पाझर, प्रवीण पाटेकर -2- कडूतात्या- गणेश मुंडे -3- रावणायण- रावबा गजमल -4- गाजराची पुंडी- प्रा. यशवंत देशमुख, उषा कांबळे -5- टेक अ चान्स- मनोज ठाकूर -7- अस्तित्व- सुनील बनकर -8- अॅनेक्स- विभाराणी, डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, नितीन गरुड -9- त्यात काय लाजायचं- राजेंद्र सपकाळ
रंगकर्मींचा उत्साह शिगेला
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत एकूण 14 नाटकांची मेजवानी मिळणार आहे. कोरोना संकटामुळे प्रयोगशील कलाकारांना पाठबळ देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन मागील दोन वर्षांपासून थांबले होते. यंदा मात्र स्पर्धा झाल्याच पाहिजे, असा आग्रह कलाकारांनी धरला होता. त्यांच्या आग्रहाला मान देत आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या पुढाकारातून राज्य नाट्य स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होत आहे. सर्व नाट्यप्रेमींनी या स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या-
नागपूर-अमरावती महामार्गावर कार ट्रेलरवर आदळली, पती-पत्नीसह पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू