Vaccine Update: दुसऱ्या डोसची तारीख लक्षात आहे ना? जाणून घ्या औरंगाबादेत किती जणांचे झाले दोन्ही डोस पूर्ण

शहरात पहिला आणि दुसरा लसीचा डोस पूर्ण झालेल्यांची आकडेवारी 20 लाख 9 हजार 688 एवढी आहे. तर कोरोना लसीचा पहिला डोस राहिलेल्यांची संख्या 68,1164 तर लसीचा दुसरा डोस राहिलेल्यांची संख्या 96,7311 एवढी आहे.

Vaccine Update: दुसऱ्या डोसची तारीख लक्षात आहे ना? जाणून घ्या औरंगाबादेत किती जणांचे झाले दोन्ही डोस पूर्ण
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 4:33 PM

औरंगाबाद: जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं तांडव शमण्याच्या मार्गावर असलं तरीही तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. या संसर्गाला सामोरे जाण्यासाठी स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत उपाययोजना सुरु आहेत. औरंगाबादमध्येही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेची दमदार कामगिरी सुरू आहे. सरकारी केंद्र (Government centre)  तसेच खासगी केंद्रांवर सक्रियरित्या ही मोहीम सुरू असून बहुतांश जणांचा पहिला डोस झाला असून आता दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे.

किती जणांचा पहिला डोस पूर्ण?

28 ऑगस्ट रोजी जारी झालेल्या आकडेवारीनुसार, विविध वयोगट आणि आरोग्य, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचा पहिला डोस पूर्ण झालेली आकडेवारी 4 लाख 95 हजार 835 एवढी आहे. एकूण उद्दिष्टापैकी 42 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील आकडेवारी जास्त म्हणजेच 1 लाख 71 हजार 236 एवढी आहे.

पूर्ण लसीकरण किती जणांचे झाले?

शहरात पहिला आणि दुसरा लसीचा डोस पूर्ण झालेल्यांची आकडेवारी 20 लाख 9 हजार 688 एवढी आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी या नागरिकांची प्रतिकारशक्ती तयार झालेली असेल. तरीही जोखीम टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडून प्रतिबंधात्मक सर्व उपायाचे पालन केले पाहिजे.

पहिला डोसही राहिलेले किती?

शहरात कोरोना लसीचा पहिला डोस राहिलेल्यांची संख्या 68,1164 तर लसीचा दुसरा डोस राहिलेल्यांची संख्या 96,7311 एवढी आहे. म्हणजेच संपूर्ण लसीकरण राहिलेल्यांची संख्या एकूण 16 लाख 48हजार 475 एवढी आहे.

महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण

दरम्यान राज्याने लसीकरणाची विक्रमी कामगिरी नोंदवत शुक्रवारी दिवसभरात सुमारे 10 लाख नागरिकांचे लसीकरण केले. आतापर्यंत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनंतर दररोज 10 लाखांपेक्षा जास्त लसीकरण केले जाऊ शकते, असे स्पष्ट झाले आहे. राज्याने आतापर्यंत केलेल्या विक्रमी कामगिरीनुसार, 21 ऑगस्ट रोजी 11 लाख 4,464 नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले.

दरम्यान,  राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्था म्हणजे NIDM या केंद्रीय गृह विभाभांतर्गत येणाऱ्या संस्थेने नुकताच एक अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केलाय. यात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अहवालात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने 40 तज्ज्ञांशी बोलून केलेल्या सर्व्हेचा हवाला देण्यात आला आहे. (statistics who completed second dose of corona vaccination in ,Aurangabad, Maharashtra)

संबंधित बातम्याः

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज, 1,367 कोटींची तरतूद

Corona LIVE : पुण्यात आणखी एक कोरोनाबळी, नगरच्या रुग्णाचा ससूनमध्ये मृत्यू

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.