AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीचा संप सुरुच, शहरातल्या 223 बसफेऱ्या रद्द, औरंगाबादेत सोमवारी ड्युटीवर रुजू होणाऱ्या प्रवाशांची कोंडी

औरंगाबादः एसटी महामंडळाच्या शासकीय सेवेत सामावून घ्यावे, वेतनवाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांच्या नेतृत्वात दिवाळीपासून संपावर आहेत. औरंगाबादमधील सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांनी रविवारी संपात सहभाग नोंदवला. रविवारी दुपारी टप्प्याटप्प्याने बारा वाजेपर्यंत संपूर्ण बससेवा ठप्प करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिवसभरात शहरातील दोन्ही आगारातील 223 बस फेऱ्या रद्द कराव्या […]

एसटीचा संप सुरुच, शहरातल्या 223 बसफेऱ्या रद्द, औरंगाबादेत सोमवारी ड्युटीवर रुजू होणाऱ्या प्रवाशांची कोंडी
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 9:13 AM
Share

औरंगाबादः एसटी महामंडळाच्या शासकीय सेवेत सामावून घ्यावे, वेतनवाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांच्या नेतृत्वात दिवाळीपासून संपावर आहेत. औरंगाबादमधील सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांनी रविवारी संपात सहभाग नोंदवला. रविवारी दुपारी टप्प्याटप्प्याने बारा वाजेपर्यंत संपूर्ण बससेवा ठप्प करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिवसभरात शहरातील दोन्ही आगारातील 223 बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एसटीचे 24 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले तर जिल्ह्यातील सर्वच आगारातील मिळून एकूण 916 बसच्या फेऱ्या काल रद्द करण्यात आल्या.

सोमवारी कामं सुरु, पण बस बंद

सोमवारी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्या संपत आहेत. कामाचा दिवस असल्याने अनेकांना आपापल्या ड्युटीच्या गावी जायचे आहे. मात्र बस सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांनीही असा स्थितीत दाम दुप्पट घेण्याची पद्धती अवलंबली आहे. तसेच प्रवाशांना अत्यंत दाटीवाटीत प्रवास करावा लागत आहे. यात महिला, लहान मुले व ज्येष्ठांचे हाल होत आहेत.

संप मागे घेण्याचा कोर्टाचा आदेश धुडकावला

एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत चर्चा करून 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संप सुरु केला . तर काही संघटनांनी केवळ विरोध दर्शवून कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून वेतन भत्ते द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु ठेवले. ऐन दिवाळीत बससेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले. हे पाहून महामंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. महामंडळाच्या याचिकेवर सुनावणी होऊन संघटनांनी संप मागे घ्यावा, असे आदेश देण्यात आले. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवत संप सुरूच ठेवला आहे. आता सर्वच ठिकाणची बससेवा 100 टक्के बंद असून प्रवाशांची कोंडी होत आहे.

इतर बातम्या-

लेबर कॉलनीः बुलडोझर दिसले तरीही भीती, रहिवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता, पालकमंत्र्यांकडून रहिवाशांना आशा

CRPF Jawan Firing | छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू, तिघे गंभीर

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.