Aurangabad: एकाच दोरीने एकाच झाडाला गळफास, अल्पवयीन मुलगी व तरुणाच्या आत्महत्येने सिल्लोडमध्ये खळबळ
सिल्लोडमध्ये एकाच झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने तरुण आणि अल्पवयीन मुलीने घेतला गळफास. अजिंठा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी उघडकीस आली आत्महत्या.
औरंगाबादः सिल्लोड येथील एका अल्पवयीन मुलीने आणि तरुणाने एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास (Suicide case) घेतल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आल्यावर परिसरात खळबळ माजली. औरंगाबादमधील (Aurangabad Police) अजिंठा पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
लिंबाच्या झाडाला गळफास
सदर प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि अल्पवयीन मुलगी हे दोघेही जळकीबाजार येथील रहिवासी होते. अल्पवयीन मुलगी आणि गावातील तरुण हे दोघेही सोमवारी सकाळी शेताकडे गेले. शेतात शरद व राजनंदनी यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन सोबतच आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
अजिंठा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन
सदर घटनेची माहिती ग्रामस्थांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिली. ही माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, फौजदार राजू राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास चौधरी, बाबा चव्हाण, संदीप जाधव, राम माळी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृतांच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार, सदर मृत्यूची नोंद करण्यात आली.
इतर बातम्या-