औरंगाबादेत टीन एजर्स इनिशिएटिव्ह ग्रुपच्या वतीने गरजूंना मिठाई, फटाके अन् ब्लँकेटचे वाटप
औरंगाबाद : गेले दीड वर्ष अवघ्या जगावर राज्य करणाऱ्या कोरोनाने सर्वसामान्य माणसांचे आयुष्यच बदलले आहे. अनेकांच्या आर्थिक स्तरावर याचा थेट परिणाम झाला आहे. रस्त्यावर राहणाऱ्या गोर-गरीब जनतेनेचे तर या काळात प्रचंड हाल झाले. या स्थितीची जाणीव ठेवून औरंगाबादमधील टीन एजर्स इनिसिएटिव्ह ग्रुपच्या वतीने शहरातील गरीब, गरजू व्यक्ती, अनाथ बालकांना दिवाळीनिमित्त काही मदत केली. त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ, […]
औरंगाबाद : गेले दीड वर्ष अवघ्या जगावर राज्य करणाऱ्या कोरोनाने सर्वसामान्य माणसांचे आयुष्यच बदलले आहे. अनेकांच्या आर्थिक स्तरावर याचा थेट परिणाम झाला आहे. रस्त्यावर राहणाऱ्या गोर-गरीब जनतेनेचे तर या काळात प्रचंड हाल झाले. या स्थितीची जाणीव ठेवून औरंगाबादमधील टीन एजर्स इनिसिएटिव्ह ग्रुपच्या वतीने शहरातील गरीब, गरजू व्यक्ती, अनाथ बालकांना दिवाळीनिमित्त काही मदत केली. त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ, फटाके तसेच ब्लँकेटची व्यवस्था केली.
सिडको बसस्टँड, उड्डाण पूल परिसरात मदत
औरंगाबाद शहरातील सिडको बसस्थानक, उड्डाण पूल परिसरातील निराधार लोकांना दिवाळीनिमित्त काही मदत व्हावी. त्यांच्याही जीवनात काही आनंदाचे क्षण यावेत याकरिता टीन एजर्स इनिशिएटिव्ह ग्रुपच्या वतीने येथील लोकांना मदत करण्यात आली. थंडीपासून बचाव करण्याकरिता त्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच दिवाळीसाठी फरसाण आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.
बालकाश्रमातील मुलांसोबत फटाके उडवले
टीन एजर्स इनिशिएटिव्ह ग्रुपच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा आज शुभारंभ पत्रकार सचिन अंभोरे यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी एन 4 येथील शोभना बालकाश्रमातील अनाथ मुलांसोबत मिठाई वाटून व फटाके फोडून दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्यात आला. समाजात गोर गरिबांना आपल्या परीने निस्वार्थपणे मदत झाली पाहिजे, असे मत व्यक्त करत प्रत्येकाने या दिवाळीत शक्य असेल तेवढी आपापल्या परीने मदत करा असे आवाहन, यावेळी सचिन अंभोरे यांनी केले. यावेळी आम्हीही शक्य तेवढी मदत करत राहणार असल्याचे आश्वासन टीन एजर्स इनेशीएटीव ग्रुप च्या वतीने देण्यात आले. या उपक्रमात पृथ्वीराज राजपूत, पियुष मोटवानी, ओम अग्रवाल, पार्थ बोरुडे, लोकेश जाधव, अनंत अग्रवाल, प्रथमेश शेवतेकर, जय किंगर, सागर कापडे, निखील बागल, अथर्व यांनी या मदतीसाठी पुढाकार घेतला.
इतर बातम्या-