School Reopen: औरंगाबादमधील शाळांचा निर्णय पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला ठरणार!

शहरातील शाळा सुरु करण्याबाबचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याता आल्याची माहिती महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुन्हा 15 डिसेंबर रोजी बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत शहरातील शाळा सुरु होण्यासंबंधी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती टेंगळे यांनी दिली

School Reopen: औरंगाबादमधील शाळांचा निर्णय पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला ठरणार!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 12:17 PM

औरंगाबादः राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे चित्र असल्याने विविध जिल्हा आणि शहरांमधील शाळा (School reopen) पूर्ववत ऑफलाइन पद्धतीने (Offline school) सुरु करण्यासंबंधी विचार सुरु आहे. राज्य शासनाने यासाठी परवानगी दिलेली असली तरीही जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रशासनाने स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेअंतर्गत (Aurangabad municipal corporation) येणाऱ्या शहरातील शाळांबाबतचा निर्णय आज 10 डिसेंबर रोजी घेण्यात येणार होता, मात्र तो आणखी पाच दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

उपायुक्त संतोष टेंगळे यांची माहिती

शहरातील शाळा सुरु करण्याबाबचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याता आल्याची माहिती महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुन्हा 15 डिसेंबर रोजी बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत शहरातील शाळा सुरु होण्यासंबंधी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती टेंगळे यांनी दिली. पुणे-पिंपरी चिंचवड आणि नाशिक महापालिकेचा निर्णय लांबणीवर पडल्यानंतर औरंगाबाद शहरातली वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे.

नांदेडमधील इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याची मागणी

नांदेडमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी संस्थाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या संस्थाचालकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिलं आहे. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तर शाळा चालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं या संस्थाचालकांनी म्हटलंय.

इतर बातम्या-

Kishori Pednekar : माझ्या दादाकडं वाकड्या नजरेनं बघू नका, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी, कुटुंबातील सर्वांना संपवण्याचा इशारा

Nagpur Video | कपड्यांवर पेट्रोलचे थेंब उडाल्याने वाद, पंपावरील महिला कर्मचाऱ्यांची तरुणीला मारहाण

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.