औरंगाबादः महिलांच्या विरोधामुळे बिअर शॉपीचे उद्घाटन गुंडाळले, परवानगी रद्द करण्यासाठी दिले निवेदन
औरंगाबादः शहरातील दौलताबाद (Daulatabad) परिसरातील मिटमिटा येथील नवीन बिअर शॉपीचा (Beer Shop) उद्घाटन सोहळा महिलांच्या विरोधामुळे अखेर रद्द करण्यात आला. परिसरातील महिलांनी या शॉपीसंदर्भात रितसर तक्रार करत बिअर शॉपीची परवानगी रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे सध्या तरी या परिसरातील हे दुकान उघडलेच नाही. बुधवारी होणार होते थाटात उद्घाटन बुधवारी मिटमिटा परिसरातील भास्कर वास्तू पूर्ती शॉपिंग […]
औरंगाबादः शहरातील दौलताबाद (Daulatabad) परिसरातील मिटमिटा येथील नवीन बिअर शॉपीचा (Beer Shop) उद्घाटन सोहळा महिलांच्या विरोधामुळे अखेर रद्द करण्यात आला. परिसरातील महिलांनी या शॉपीसंदर्भात रितसर तक्रार करत बिअर शॉपीची परवानगी रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे सध्या तरी या परिसरातील हे दुकान उघडलेच नाही.
बुधवारी होणार होते थाटात उद्घाटन
बुधवारी मिटमिटा परिसरातील भास्कर वास्तू पूर्ती शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नवीन बिअर शॉपी सुरु होणार होती. मान्यवरांच्या हस्ते बिअर शॉपीचे उद्घाटनही होणार होते. दरम्यान, परिसरात बिअर शॉपी सुरु होणार असल्याची माहिती मिळताच काही वेळातच महिलांसह परिसरातील नागरिक दुकानासमोर मोठ्या संख्येने गोळा झाले. त्यांनी या शॉपीला विरोध करत आपला संताप व्यक्त केला. नागरिकांच्या विरोधामुळे मालकाने बिअर शॉपीचा उद्घाटन सोहळा रद्द केला.
परवानगी रद्द करण्याची मागणी
दरम्यान, मिटमिटा येथील बियर शॉपीची परवानी रद्द करण्यात यावी यासाठी आमदार संजय शिरसाठ, पोलीस आयुक्त निखिल कुमार गुप्ता, एक्साइज विभाग यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख व तारांगण सोसायटीचे परेश शिंदे यांनी दिली. घटनेची माहिती छावणी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक शरद इंगळे आपला फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. संतप्त महिलांची समजूत काढत त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. छावणी पोलीस ठाण्यातदेखील येथील नागरिकांनी सदर दुकान बंद करण्यासंबंधी निवेदन दिले.
जटवाड्यातील खदानीत आढळला तरुणीचा मृतदेह
हर्सूल ते जटवाडा रस्त्यावरील एका खदानीत बुधवारी सायंकाळी अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला. मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असल्याने ताे दोन दिवसांपासून खदानीत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. रात्री उशिरापर्यंत तरुणीची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजता खदानीजवळ काही महिला काम करत होत्या. तेव्हा एका महिलेला पाण्यात अंदाजे २६ ते ३२ वयोगटातील तरुणीचा मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती मिळताच बेगमपुरा पोलिसांसह अग्निशमन विभागाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढून घाटीत पाठवला. मृतदेहावर मारहाणीचे व्रण दिसले नाहीत. मात्र, नाकातोंडातून रक्त बाहेर येत होते. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या-