सावधान! औरंगाबादेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत चार ठिकाणी चोऱ्या, घर,दुकान,ऑफिसमध्ये लूट

औरंगाबादः दिवाळीच्या सुरुवातीलाच शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. शहरात एकाच रात्रीतून शहरातील विविध भागात चार घरे फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापैकी दोन घरफोड्या एमआयडीसी सिडको (MIDC CIDCO) आणि छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या (Mukundwadi Police Station) हद्दीत दोन चोऱ्या झाल्याची नोंद पोलीस ठाण्यांत झाली आहे. घटना 1 […]

सावधान! औरंगाबादेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत चार ठिकाणी चोऱ्या, घर,दुकान,ऑफिसमध्ये लूट
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 1:07 PM

औरंगाबादः दिवाळीच्या सुरुवातीलाच शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. शहरात एकाच रात्रीतून शहरातील विविध भागात चार घरे फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापैकी दोन घरफोड्या एमआयडीसी सिडको (MIDC CIDCO) आणि छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या (Mukundwadi Police Station) हद्दीत दोन चोऱ्या झाल्याची नोंद पोलीस ठाण्यांत झाली आहे.

घटना 1

सिडको एन-1 मधील सेक्टर बी येथील रवि शेषराव जाधव हे 31 ऑक्टोबर रोजी कुटुंबाला घेऊन गावी गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरमालक इंदर बोराडे यांनी त्यांना फोनद्वारे कुलूप तुटल्याचे कळवले. रात्री 10 वाजता जाधव घरी आले असता 15 हजार रुपयांचा एलईडी टीव्ही चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना 2

मुकुंदवाडीतील रेखा सिद्धार्थ त्रिभुवन (रा. गल्ली नं. 12, जयभवानीनगर) या 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कामाला गेल्या होत्या, तर त्यांची दोन्ही मुले आजीकडे उस्मानपुरा येथे गेली होती. काम संपवून रेखा त्यांच्या आईकडे मुक्कामी गेल्या. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन करून घराचे कुलूप तुटलेले असल्याचे सांगितले. रेखा घरी आल्या असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील 22 हजार रोख, 15 हजारांच्या साड्या व मुलीचे ड्रेस असा 37 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

घटना 3

मुकुंदवाडी येथील विजय गेनमल कटारिया (रा. प्लॉट नं. 354, एन-3, सिडको) यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, ते 31 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता सिडको एन- 2, मायानगर येथील ऑफिस बंद करून घरी गेले. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता अॅफिसला गेले असता त्यांना कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी पाहणी केली असता 5 हजार रुपयांचा टीव्ही आणि 25 हजारांचा लॅपटॉप चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

घटना 4

पडेगाव येथील श्रीराम सुरेश कुंदे (रा. गोविंदा टॉवर, छत्रपती शिवाजी महाराज चौक) यांचे गोविंदा मेडिकल आणि मॉल आहे. त्यांच्या शेजारी शेख कलीम यांचे पॅसिफिक लॅब नावाचे दुकान आहे. 31 ऑक्टोबर रोजी कुंदे रात्री हे 10 वाजता त्यांचे दुकान बंद करून घरी गेले. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता ते दुकानावर आले असता त्यांना कुलूप तुटलेले दिसले. दुकानात जाऊन पाहणी केली असता 5,500 रोख तसेच 3,858 रुपयांचे दुकानातील सामान आणि शेख कलीम यांच्या लॅबमधील 3,300 रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य असा 12,658 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समजले.

माझा शेजारी, खरे पहारेदार, पोलिसांचे मिशन

दिवाळीच्या सणासाठी अनेक नागरिक गावाला जातात किंवा शहरातील नातावाईकांकडे मुक्कामी जातात. अशा वेळी घराला कुलूप पाहून चोरांकडून घरफोड्या होऊ नये म्हणून आपल्या शेजाऱ्यांना याची कल्पना देण्याचे आवाहन औरंगाबाद शहर पोलिसांनी केले आहे. तसेच आपल्या जवळच्या पोलीस चौकीतही गावाला जाण्याची कल्पना द्यावी, जेणेकरून पोलीस संबंधित भागातील गस्त वाढवतील, अशा सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत. दिवाळीच्या सणात होणाऱ्या घरफोड्यांमुळे पोलिसांनी आधीपासूनच तयारी केलेली असली तरीही चोरांचा सुळसुळाट वाढल्याने घरफोड्या झाल्याचे दिसून येत आहे.

इतर बातम्या

गुंठेवारी संचिकांसाठी वास्तुविशारदांना पैसे देऊ नका, औरंगाबाद महापालिकेचे आवाहन, पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार!

औरंगाबादेत नो व्हॅक्सिन नो रेशन, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, डिसेंबरचे वेतनही रोखणार, वाचा आणखी काय सूचना? 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.