Aurangabad crime: सातारा परिसरात दिवसाढवळ्या घरं फोडली, लोको पायलट आणि इंजिनिअरच्या घरात चोरी, सीसीटीव्हीत चोरटे कैद
काही दिवसांपूर्वी महिलांचा गाऊन घालून चोरी करणारा एक चोर सीसीटीव्हीत कैद झाला होता. आता काही दिवसातच सातारा परिसरातीलच आणखी दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे घरफोडीला आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
औरंगाबाद: शहर आणि परिसरातील चोरी आणि घरफोडीची (Theft in Aurangabad) मालिका थांबता थांबत नाहीये. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातही (Satara Area in Aurangabad) रविवारी दिवसा ढवळ्या चोरी झाल्याचे समोर आले आहे. रविवारी बाहेर फिरायला गेलेले इंजिनिअर आणि रेल्वे विभागातील लोको पायलटचे घर फोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. चोरी करणारे दोन आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTv Camera) कैद झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले घरफोडीचे हे सत्र थांबवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
रविवारी घरी आल्यावर कडी तुटलेली दिसली
सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील विठ्ठलसिंग राजपूत व रघुनाथ गराय असे चोरी झालेल्या घरमलकांची नावे आहे. राजपूत हे इंजिनिअर आहेत. रविवारी सुट्टी असल्याने ते सकाळी म्हैसमाळ येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून संध्याकाळी जेंव्हा ते घरी आले तेंव्हा त्यांचा घराची कडी तोडल्याचे त्यांना दिसले. संशय आल्याने त्यांनी सातारा पोलिसांना घटनेची माहिती दिली. घराची पाहणी केली असता घरातील कापटची तिजोरी फोडण्यात अली होती. व त्यामधील रक्कम असलेला गल्ला चोरट्यानी लंपास केला. घरात मौल्यवान वस्तू नसल्याने चोरट्यानी तेथून काढता पाय घेतला.
काही वेळातच दुसरे घर फोडले
एका घरात फार काही ऐवज हाती लागला नाही म्हणून चोरट्यांनी याच परिसरातील दुसऱ्या घरातही चोरी केली. चोरट्यांनी राजपूत यांच्या घराजवळील शिवकृपा अपार्टमेंटला लक्ष्य केले. चौथ्या मजल्यावर राहणारे रघुनाथ गराय हे रेल्वे विभागात लोको पायलट आहेत.ते नोकरीनिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास चोरट्यानी चौथ्या मजल्यावर जाऊन गराय यांच्या घराची कडी तोडली. घरातील एक तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन महागड्या घड्याळ, चार ते पाच हजार रुपये रोख असा साहित्य लंपास करण्यात आला आहे. चोरीची सर्व घटना सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यामध्ये दोन चोरटे दिसत आहे. अशी माहिती गराय आणि राजपूत यांनी दिली. या प्रकरणी सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये घरफोडीचे प्रमाण खूप वाढले आहे. रात्री तसेच दिवसा-ढवळ्याही चोरटे खुशाल सोसायटीत घुसून घर फोडून सामान लंपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांचा गाऊन घालून चोरी करणारा एक चोर सीसीटीव्हीत कैद झाला होता. आता काही दिवसातच सातारा परिसरातीलच आणखी दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे घरफोडीला आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
इतर बातम्या-
Aurangabad Crime: जनावरांची चोरी करून धुमाकुळ घालणारी टोळी बैलपोळ्याच्या दिवशी जेरबंद