चार दिवस उसात लपून बसला, मुंबईला जाताच मुसक्या आवळल्या, तोंडोळी बलात्कार प्रकरणी सहावा आरोपी जेरबंद

औरंगाबादः पैठण तालुक्यातील तोंडोळी दरोडा (Tondoli robbery and gang rape) व सामूहिक बलात्कार प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी आणखी तीन दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. या तिघांपैकी दोन दरोडेखोरांना वैजापुरातून अटक केली तर एकाला मुंबईत पकडण्यात आले. मुंबईला पळालेला हा दरोडेखोर चार दिवस उसात लपला होता. मात्र मुंबईला जाताच पोलिसांच्या जाळ्यात सापडला. स्थानिक गुन्हे शाखा (Aurangabad crime branch) […]

चार दिवस उसात लपून बसला, मुंबईला जाताच मुसक्या आवळल्या, तोंडोळी बलात्कार प्रकरणी सहावा आरोपी जेरबंद
तोंडोळी येथील शेतवस्तीवर 19 ऑक्टोबर रोजी दरोड्याची घटना
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 3:26 PM

औरंगाबादः पैठण तालुक्यातील तोंडोळी दरोडा (Tondoli robbery and gang rape) व सामूहिक बलात्कार प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी आणखी तीन दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. या तिघांपैकी दोन दरोडेखोरांना वैजापुरातून अटक केली तर एकाला मुंबईत पकडण्यात आले. मुंबईला पळालेला हा दरोडेखोर चार दिवस उसात लपला होता. मात्र मुंबईला जाताच पोलिसांच्या जाळ्यात सापडला. स्थानिक गुन्हे शाखा (Aurangabad crime branch) व बिडकीन पोलिसांनी (Bidkin Police) या दरोड्यातील सहा आरोपींना सात दिवसात जेरबंद केले आहे.

वैजापूर व मुंबईत मुसक्या आवळल्या

तोंडोळी दरोडा प्रकरणी अटक झालेल्या तीन आरोपींची नावे नंदू भागिनाथ बोरसे, अनिल भाऊसाहेब राजपूत, किशोर अंबाजास जाधव अशी आहेत. बोरसे आणि राजपूत या दोघांना वैजापूर तालुक्यातील त्यांच्या नातेवाईकांच्या घरातून दुपारी अटक करण्यात आली. तिसरा आरोपी किशोर जाधव हा मूळचा सोनईचा आहे. मात्र अनेक वर्षांपासून तो पैठण तालुक्यातील गिधाडा भागात स्थायिक आहे. त्याच्याविरुद्ध डीपी चोरणे, दरोड्याची तयारी करणे, लूटमार करणे आदी गुन्हे दाखल आहेत. दरोड्याच्या घटनेनंतर तो पोलिसांच्या भीतीने चार दिवस शिवारातच उसात लपून बसला होता. मात्र, निसटून जाण्याच्या उद्देशाने त्याने मुंबईला पळ काढला. तो जसा मुंबईला गेला तसाच पोलिसांनी त्याला परत आणला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सहा आरोपी जेरबंद, सातव्याचा शोध सुरू

19 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पैठण तालुक्यातील बिडकीन जवळील तोंडोळी शेतवस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला केला. या वस्तीवर मध्यप्रदेशातील आलेले कुटुंब राहत होते. दोन पुरुष आणि चार महिलांच्या या कुटुंबावर दरोडेखोरांनी हल्ला केला. यातील दोन पुरुषांना बांधून ठेवून दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केला. या दरोड्याच्या आधीही इतर परिसरात दरोड्याच्या काही घटना घडल्या. त्यामुळे ग्रामीण भागात चांगलीच दहशत पसरली होती. सामाजिक कार्यकर्ते आणि नेतेमंडळींनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाईची मागणी केली होती. दरम्यान या प्ररकणी पोलिसांनी सात आरोपींपैकी सहा जणांना जेरबंद केले आहे. यात प्रभू पवार(म्होरक्या), विजय जाधव, सोमनाथ राजपूत, नंदू बोरसे, अनिल राजपूत, किशोर जाधव अशा सहा जणांना अटक झाली असून सातव्या दरोडेखोराचा शोध पोलीस घेत आहेत.

इतर बातम्या-

15 नोव्हेंबरपासून शासकीय कार्यालयात नो लस नो एंट्री, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाचा इशारा 

Crime: नवजात मुलीला कचऱ्यात फेकले, औरंगाबादच्या किराडपुऱ्यातली घटना, घाटी रुग्णालयात मृत्यू

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.