Aurangabad Gold: सोन्याचे भाव शंभर रुपयांनी वाढले, जाणून घ्या औरंगाबादेतल्या सराफा मार्केटमधील दर
औरंगाबाद शहरातील सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,000 रुपये प्रति तोळा एवढे आहेत तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 66700 रुपये असे आहेत.
औरंगाबाद: गेल्या आठवड्यात प्रचंड अस्थिरता दर्शवल्यानंतर यंदाच्या आठवड्यात औरंगाबादमध्ये सोन्याचे भाव (Gold and silver rate in Aurangabad market) काहीसे स्थिर असल्याचे चिन्ह आहेत. मात्र सोने अजूनही 47 हजार रुपये प्रति तोळा या दरांच्या पुढे जायला तयार नाही. तसेच चांदीच्या भावातही फारशी सुधारणा नाही. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचा सल्ला गुंतवणूक (Investment in Gold) तज्ञांकडून दिला जात आहे.
शहरातील सोन्या-चांदीचे भाव
औरंगाबाद शहरातील सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,000 रुपये प्रति तोळा एवढे आहेत. काल म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी सोन्याचे भाव जवळपास हेच होते. त्या आधीच्या दिवसांमध्ये सोन्याच्या भावात काहीशी घसरण झालेली दिसून आली होती. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही फारशी वृद्धी दिसून आलेली नाही. औरंगाबादच्या बाजारात आज एक किलो शुद्ध चांदीचे दर 66700 रुपये असे आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या अनेक घडामोडींचा परिणाम कमोडिटीज मार्केटवर होत असतो. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने खरेदी करणे स्वस्त झाले आहे. येत्या काळात सोने आणि चांदीच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात. कारण अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध उपाययोजनांवर अनेक देशांच्या सरकारांकडून भर दिला जात आहे. म्हणूनच शेअर बाजारात तेजी आणि सोन्या-चांदीच्या गुंतवणुकीबाबत काहीसा निरुत्साह दिसून येत आहे.
काही मिनिटांत ओळखा सोने बनावट की खरे?
– सोन्याला चुंबकीय गुणधर्म नसतात किंवा त्याऐवजी ते चुंबकाकडे आकर्षित होत नाही. जर तुमचा दागिना चुंबकाकडे खेचू लागला तर समजून घ्या की ते बनावट आहे, तर जर त्या दागिन्यांवर चुंबकाचा कोणताही परिणाम झाला नाही तर ते चाचणीच्या पहिल्या फेरीत पास होईल.
– सोन्यावर कधीच घाण आढळत नाही, म्हणून जर सोन्यावर घाण दिसली तर समजून घ्या की ते बनावट आहे आणि असे बनावट सोने चुंबकाकडे आकर्षित होईल.
– सोन्याबद्दल एक विशेष गोष्ट आहे की ते एक कठीण धातू आहे, म्हणून ती फ्लोटिंगसाठी तपासली जाऊ शकते. एका बादलीत थोडे पाणी घ्या आणि नंतर त्या पाण्यात तुमचे सोन्याचे दागिने घाला.
– जर तुमचे दागिने बुडले तर समजले की ते फ्लोटिंग टेस्ट सुद्धा पास झाले आहे, पण जर ते फ्लोटिंग करायला लागले तर समजून घ्या की दुकान मालकाने तुम्हाला खरा फोन करून बनावट सोने विकले आहे.
– नायट्रिक अॅसिडचा वास्तविक सोन्यावर कोणताही परिणाम होत नाही. तथापि, जर ते तांबे, जस्त, स्टर्लिंग चांदी किंवा इतर काही असेल तर त्यावर नायट्रिक अॅसिडचा प्रभाव दिसून येईल.
– चाचणी करण्यासाठी, दागिन्यांना किंचित स्क्रॅच करा आणि त्यावर नायट्रिक अॅसिड घाला. जर ते सोने असेल तर त्याचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, ही चाचणी करताना अत्यंत सावधगिरी बाळगा, अन्यथा अॅसिड तुम्हाला हानी पोहोचवू शकते.
इतर बातम्या-