AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत मिटमिटा रस्त्यावर दोघांचा मृत्यू, विनादुभाजकाचा दुपदरी रस्ता आणखी किती जणांचे बळी घेणार?

नगरनाका ते शरणापूर असा हा रस्ता जवळपास, 80 फूट रुंद आहे. या रस्त्यात कुठेही दुभाजक टाकलेले नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणखी एक अपघात होऊन यात दोघांचा बळी गेला आहे.

औरंगाबादेत मिटमिटा रस्त्यावर दोघांचा मृत्यू, विनादुभाजकाचा दुपदरी रस्ता आणखी किती जणांचे बळी घेणार?
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 4:41 PM
Share

औरंगाबादः वेरूळ-दौलताबाद या जागतिक पर्यटनस्थळांच्या दिशेने जाणाऱ्या नगर नाका ते शरणापूर या विना दुभाजकाच्या दुपदरी रस्त्याने आतापर्यंत शेकडो जणांचा बळी घेतला आहे. आता ऐन दिवाळीत येथे आणखी एक अपघात झाला असून या घटनेत दोघांचा गंभीर मृत्यू झाला आहे. मिटमिट्यातील फौजी धाब्यासमोर विरुद्ध दिशेने आलेल्या वाळूच्या हायवाने दोन दुचाकीस्वारांचा बळी घेतला आहे.

80 फूट रुंद रस्त्यावर दुभाजकच नाही

नगरनाका ते शरणापूर असा हा रस्ता जवळपास, 80 फूट रुंद आहे. या रस्त्यात कुठेही दुभाजक टाकलेले नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणखी एक अपघात होऊन यात दोघांचा बळी गेला आहे. या रस्त्यावर आता आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन इथे दुभाजक लावेल, असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिक करत आहेत.

दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

सोमवारी मिटमिटा रस्त्यावर झालेल्या अपघातात दोन कुटुंबावर काळानं घाव घातला. वाळुच्या हायवाने दुचाकीस्वार दोघांचा बळी घेतला. सोमवारी माळीवाड्याच्या दिशेने वाळुचा हायवा वुरुद्ध दिशेने जात होता. याचवेळी माळीवाड्याकडून दुचाकीने सेवानिवृत्त शिक्षक कमलाकर ज्ञानेश्वर दैठणकर आणि सुरेश पांडुरंग खंडागळे हे छावणीच्या दिशेने येत होते. तेवढ्यात त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या हायवाने जबरदस्त धडक दिली. दैठणकर हे पंधरा फूट फरफटत गेले. त्यासोबत भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने चरण वाघमारे यांच्या दुचाकीलाही ठोकरले. यात वाघमारेदेखील गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच हायवा चालकाने वाहनातून पळ काढला. वाघमारे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील एक दैठणकर हे सरस्वती भवन शाळेत शिक्षक होते. दोन-तीन वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. गेल्या 40 वर्षांपासून ते शिवशंकर कॉलनीत वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात मुलगा विवाहित मुली आणि पत्नी असा परिवार आहे. तर दुसरे मयत खंडागळे हे मुळचे जालन्यातील मंठा तुलक्यातील कटाळा खुर्द येथील रहिवासी होते. दहा वर्षांपूर्वी ते शहरात आले होते. गारखेडा परिसरात भाजीपाला विक्री करून ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या पश्चात मुलगा, एक विवाहित तर दुसरी अविवाहित मुलगी असून पत्नी घरकाम करते.

पर्यटकांचा अखंड ओघ,  रस्ता चौपदरीकरणाची मागणी

शहरातून वेरूळ, दौलताबादचा किल्ला, खुलताबाद, म्हैसमाळ, शुलीभंजन या पर्यटन स्थळांकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर पर्यटकांना अखंड ओघ सुरु असतो. औरंगाबादहून या पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी नगर नाका ते शरणापूर-दौलताबाद टी पॉइंट हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. अपघाताचा प्रमाण वाढत असल्याने हा रस्ता आता चौपदरी करण्याची मागणी जोर धरत आहे.

इतर बातम्या-

लेबर कॉलनी क्वार्टरवर दिवाळीनंतर बुलडोझर फिरणार, कारवाईच्या नोटिसीने रहिवासी धास्तावले, इम्तियाज यांची भेट

धक्कादायकः सावत्र बापाकडून मुलीवर लैंगिक छळ, आईचीही सहमती, वर्षभरापासून धमक्या अन् दहशत, वैजापूरात खळबळ

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.