औरंगाबादेत अनोखी करवा चौथ, विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या पतींना पत्नींकडून हेल्मेटची भेट

औरंगाबादमध्ये आपका भविष्य आपके हाथ, हेल्मेट सदा रहे आप के साथ हा उपक्रम साकारण्यात आला. या दुचाकीवरून हल्मेट न घालता प्रवास करणाऱ्या 50 पेक्षा जास्त पुरुषांना त्यांच्याच पत्नीच्या हस्ते हेल्मेट देण्यात आले.

औरंगाबादेत अनोखी करवा चौथ, विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या पतींना पत्नींकडून हेल्मेटची भेट
करवा चौथ निमित्त पत्नीच्या हस्ते पतीला हेल्मेट भेट देण्याचा उपक्रम
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 6:28 PM

औरंगाबादः करवा चौथ निमित्त (Karwa chauth) औरंगाबाद शहरात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. जे पती विना हेल्मेट वाहने चालवतात, त्या पतींना त्यांच्याच पत्नीच्या हाताने हेल्मेटची (Helmet Gift) भेट देण्यात आली. कुटुंबाप्रतीची जबाबदारी पार पाडत असताना आपण आपलीही काळजी घेतली पाहिजे, असा संदेश या पत्नींनी पतींना दिला. शहरात रोटरी क्लबच्या (Rotary club) वतीने एका आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून पती-पत्नीच्या नात्यातील हा महत्त्वाचा सण साजरा करण्यात आला.

हेल्मेट सदा रहे आपके साथ

शहरातील महावीर चौक, जकात नाका परिसरात हा उपक्रम घेण्यात आला. रोटरी क्लबच्या अध्यक्ष ज्योती काथार यांच्या संकल्पनेतून आपका भविष्य आपके हाथ, हेल्मेट सदा रहे आप के साथ हा उपक्रम साकारण्यात आला. या दुचाकीवरून हल्मेट न घालता प्रवास करणाऱ्या 50 पेक्षा जास्त पुरुषांना त्यांच्याच पत्नीच्या हस्ते हेल्मेट देण्यात आले. पती-पत्नी हे दोघेही कुटुंबासाठी महत्त्वाचे आहेत. तेव्हा पत्नी जशी कुटुंबाची काळजी घेते, तसेच आपल्या माणसांची काळजी घेण्यासाठी पतीनेही आठवणीने बाहेर पडताना हेल्मेट सोबत नेणे, तितकेच महत्त्वाचे आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालनही करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन या उपक्रमाद्वारे करण्यात आले. क्लबच्या वतीने या वेळी हे हेल्मेट मोफत देण्यात आले. या उपक्रमासाठी रोटरी अध्यक्ष ज्योती काथार यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास पोलिस उपआयुक्त उज्जवला बनकर, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे,सेवानिवृत्त पोलिस उपनिरिक्षक रो.जेम्स अंबिलढगे ,आदी उपस्थित होते.

आमचाही हा सत्कारच..

गृहणीही घराचा आधार असते. समाजरचनेत कुटुंबव्यवस्था, आरोग्य, प्रतिष्ठा जपण्याचे कार्य महिला पार पाडत असतात. आज आमच्या हाताने आमच्याच पतीला हेल्मेट देण्याचा हा स्तुत्य उपकम राबवून आमचा मानही वाढवला आहे.आमच्या अस्तिवाचे मोल जाणवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी दिली.

इतर बातम्या-

सोन्याची चमक वाढतच जाणार, दिवाळीनंतर भावात आणखी तेजी, वाचा औरंगाबादचे भाव

Weather: ऐन हिवाळ्यात ढगांचे मळभ का? तळपता सूर्य पुन्हा का गायब झाला? वाचा मराठवाड्यातला हवामानाचा अंदाज

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.