Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद | चंपा चौकात तलवारी नाचवणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात, वाहनांची केली होती तोडफोड

24 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेमुळे चंपा चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. या प्रकरणी आरोपींना शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तायर केली होती.

औरंगाबाद | चंपा चौकात तलवारी नाचवणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात, वाहनांची केली होती तोडफोड
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 12:42 PM

औरंगाबादः मागील आठवड्यात शहरातील चंपा चौक परिसरात (Champa Chauk) हातात तलवारी घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police)ताब्यात घेतले आहे. गुरुवारी 24 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चंपा चौकातील बाजारपेठेत एका टोळक्याने हवेत तलवारी भिरकावत व्यावसायिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात (Sword Attack) केली होती. तसेच तलवारींनी वाहनांवर वार करायला सुरुवात केली होती. या प्रकरणी पोलिसांनी काल मंगळवारी तिघांना ताब्यात घेतले आहे.

काय घडलं होतं त्या दिवशी?

गुरुवारी रात्री नऊ वाजता चंपा चौकातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरु होती. दुकानात ग्राहकांची गर्दी होती. तर रस्त्यावरही अनेक वाहनांची ये-जा सुरु होती. तेवढ्यात पटेल आणि त्याच्या टोळक्याने हवेत तलवारी भिरकावत व्यावसायिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकाने बंद करण्याच्या धमक्या सुरु केल्या. तलवारींनी वाहनांवर वार करायला सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त दीप गिऱ्हे, निरीक्षक अशोक गिरी, विनोद सलगरकर, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर ,रोहित गांगुर्डे यांच्याह दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झालं. तोपपर्यंत हे टोळकं तेथून निघून गेलं होतं.

तिघांना घेतले ताब्यात

24 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेमुळे चंपा चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. या प्रकरणी आरोपींना शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तायर केली होती. काल शेख अश्फाख शेख इसाक, शेख मुश्ताक शेख इसाक, शाहरूख रहेमतुल्ला खान या तीन युवकांना सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसात विविध भागात गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. नशेखोरीचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक टोळ्या तयार झाल्या असून साध्या-साध्या कारणांमुळे वाद, भांडण आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत. सदर चंपा चौक येथील घटना घडण्याच्या आठ दिवस आधीच आरोपी जामीनावर सुटला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने एका टोळीसोबत हाणामारी केली. तर दोन दिवसांनी चंपा चौक परिसरात असा थरार घडवला. त्यामुळे शहरातील वाढत्या गुंडगिरीवर पोलिसांनी लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या-

याला म्हणतात शिस्त..! ‘हे’ चित्र भारतातलंच आहे, Anand Mahindra यांनी Share केला Photo

Jacqueline Fernandez Photo : जॅकलिन फर्नांडिसचा ‘निळा’ अंदाज, ग्लॅमरस लूकवरून नजर हटवणं कठीण!

आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.