पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली अन् अख्खं गाव रडलं, संजय अहिरेंच्या निरोप समारंभाची एकच चर्चा
देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातून त्यांची बदली औरंगाबाद पोलिसात झाली आहे. त्यांचा येथील कामाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांना अत्यंत भावूक होऊन गावातील लोकांनी निरोप दिला आहे.
औरंगाबाद : आपल्या सहकाऱ्याची बदली किंवा निवृत्ती होत असेल तर आपण साहजिकच भावूक होतो. त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देतो. मात्र, सहाकारी सोडून जाणार याचे दु:ख आपल्या मनात कुठेतरी असतेच. मात्र, एखादा अधिकारी निवृत्त किंवा बदलीवर जात असाताना जनताच भावूक झाल्याचा प्रसंग तुम्ही कुठे पाहिला आहे का ? असा प्रसंग औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे पाहायला मिळालाय. देवगाव अंगारी येथील पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांची बदली झाल्यामुळे अख्खं गावच रडलं आहे. (villagers cried in farewell ceremony of Deogaon Rangari police inspector Sanjay Ahire aurangabad)
संजय अहिरेंची बदली झाली, अख्खं गाव रडलं
हृदयस्पर्शी तसेच अतिशय सोज्वळ अधिकारी पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांची ओखळ आहे. ते मागील काही वर्षांपासून देवगाव अंगारी येथे कर्तव्यावर आहेत. त्यांची भाषाशैली, लोकांना प्रेमाणे बोलण्याची सवय यामुळे येथील लोकांच्या मनात त्यांचे वेगळेच स्थान आहे. मात्र, आता त्यांची बदली झाली आहे. देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातून त्यांची बदली औरंगाबाद पोलिसात झाली आहे. त्यांचा येथील कामाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांना अत्यंत भावूक होऊन गावातील लोकांनी निरोप दिला आहे. त्यांच्या या निरोप समारंभाचा हा व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ :
भावूक होत आगामी कामगिरीसाठी शुभेच्छा
देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांच्या बदलीनंतरच्या निरोप समारंभात सर्व कर्मचाऱ्यांसह पूर्ण परिसरातील नागरिकच भावूक झाले. देवगाव रंगारी औरंगाबाद येथून त्यांची बदली औरंगाबाद पोलीस येथे झाली आहे. मात्र, खाकी वर्दीतल्या देव माणसाची बदली झाल्यामुळे सगळ्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांच्या भावी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इतर बातम्या :
PHOTOS: पृथ्वीवरील सर्वात रहस्यमय ठिकाणं, अजूनही या जागांविषयीच्या गुपितांचा खुलासा नाहीच
मग तालिबानमध्ये जा, केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा जावेद अख्तर यांना अजब सल्लाhttps://t.co/VHmBeP19o8#JavedAkhtar | #RSS | #BJP | #kapilpatil | #Talibans
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 5, 2021
(villagers cried in farewell ceremony of Deogaon Rangari police inspector Sanjay Ahire aurangabad)