AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कसं रोखायचं?; औरंगाबादमधील डॉक्टरांना मिळणार घाटीत प्रशिक्षण

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (we are ready to face corona third wave, says astik kumar pandey)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कसं रोखायचं?; औरंगाबादमधील डॉक्टरांना मिळणार घाटीत प्रशिक्षण
covid review meeting aurangabad
| Updated on: May 03, 2021 | 8:31 PM
Share

औरंगाबाद: देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही तिसरी लाट रोखण्यासाठी औरंगाबाद महापालिका सज्ज झाली आहे. ही लाट रोखण्यासाठी औरंगाबादमधील डॉक्टरांना घाटी रुग्णालयात विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. (we are ready to face corona third wave, says astik kumar pandey)

औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज कोरोा परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, आमदार अतुल सावे, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार हरीभाऊ बागडे यांच्यासह महानगर पालिक आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोगय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी ही माहिती दिली.

भविष्यातील तिसऱ्या लाटेकरीता प्रशासन तयारीत असून त्याचाच एक भाग म्हणून मनपा डॉक्टरांना आय.सी.यूमध्ये वापरात येणाऱ्या विविध यंत्राचा वापर कसा करावा याकरिता या डॉक्टरांना घाटीमध्ये प्रशिक्षणाकरीता पाठवण्याचे नियोजन आहे, असं महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितलं.

दररोज पाच हजार टेस्टिंग

यावेळी पालिका आयुक्त पाण्डेय यांनी शहरात दररोज 5000 टेस्टींग होत असून शहरात कॉन्टेक्ट ट्रेसींग देखील नियमित होत असल्याची माहिती दिली.

पाच ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही महत्त्वाची माहिती दिली. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. तो सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत. तसेच घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्रॉन या ठिकाणी ऑक्सिजन साठा वाढविण्यात येत असून ऑक्सिजन उपलब्धता सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पैठण आदी ग्रामीण भागातही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून प्रकल्पासाठी 6 कोटी 60 लाख इतक्या निधीला मान्यता देखील मिळाली आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम सी.एस.आरमधून चालू करण्यात आले असून या प्रकल्पातून एकूण 11kl इतक्या ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं. जिल्ह्यातील काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात सर्वांच्या प्रयत्नांना यश येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. यापुढेही कोविड- 19 प्रतिबंधक कामातील सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय दक्ष राहून काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

औरंगाबादचे व्हेंटिलेटर इतर जिल्ह्यांना देऊ नका

यावेळी खासदार कराड यांनी शहरातील अतिरिक्त व्हेंटीलेटरचा उपयोग हा घाटीमधील व्हेटींलेटर बेड वाढवण्याकरिता करण्याची सूचना केली. खासदार इम्तियाज जलील यांनी दिवसेंदिवस रुग्णालयात आग लागण्याचे प्रमाण वाढत असून प्रत्येक रुग्णालयात नियमित आगप्रतिबंधात्मक उपाय योजनांची तपासणी करण्याची सूचना केली. तर आमदार उदयसिंह राजपूत यांनी कन्नडमध्ये एम.डी फिजिशियन डॉक्टर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. सीएसआर फंडातून घाटीला देण्यात आलेले व्हेंटीलेटर कार्यान्वित करण्यात आले काॽ शहरात होत असलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनची दुरुस्ती लवकरात लवकर करावी आदी सूचना आमदार अतुल सावे यांनी केल्या. तर आमदार हरिभाऊ बागडे यांनी आमदार निधीतून रुग्णवाहिका घेण्याची इच्छा व्यक्त केली. शहरात उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर मराठवाड्याच्या बाहेर न देता आपल्या जिल्ह्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावे अशा सूचना सर्व आमदारांनी केल्या. (we are ready to face corona third wave, says astik kumar pandey)

संबंधित बातम्या:

रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची रुग्णांच्या नातेवाईकांना सक्ती करू नका; राजेश टोपे यांचे निर्देश

Photo : ‘ब्रेक द चेन’, औरंगाबादेत संचारबंदीला चांगला प्रतिसाद

औरंगाबादेत पोलिस मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, सीसीटीव्हीमुळे ट्विस्ट

(we are ready to face corona third wave, says astik kumar pandey)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.