Aurangabad: जिल्ह्यातल्या निवडणुकीत यंदा 53 हजार नवे मतदार, 21 हजारांची नावं वगळणार, 5 जानेवारीला अंतिम यादी
निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक विभागाला मतदारांची नवी यादी तयार करण्यासाठीची मुदत संपली असून नवीन मतदार, तसेच नावं वगळण्यासाठी अनेक अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्याची सुधारीत यादी 5 जानेवारी रोजी जाहीर केली जाईल.
औरंगाबादः आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नवीन मतदारांच्या नोंदणी, मयत, स्थलांतरीतांचे नावे वगळणे, नावातील दुरुस्ती आदी सुधारणानंतर नवीन मतदार यादी 5 जानेवारीपर्यंत जाहीर करण्यात येणार येईल. आतापर्यंत जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 53 हजार 114 अर्ज दाखल झाले आहेत. तर मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी 21 हजार 203 जणांचे अर्ज जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाले आहेत
1 जानेवारी 2022 अर्हता दिनांक
जिल्ह्यात लवकरच मनपा आणि जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात 1 जानेरावी 2022 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार, 30 नोव्हेंबरपर्यंत नवीन नाव नोंदणी, नाव वगळणे, स्थलांतर आणि नावातील दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीनंतर आता नवीन मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या 21 हजार 203 वर पोहोचली आहे. तर नावात दुरुस्तीसाठी 7 हजार 810 आणि स्थलांतरीतांसाठीचे 2 हजार 408 अर्ज जिल्हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. 20 डिसेंबरपर्यंत हे अर्ज निकाली काढून 5 जानेवारीपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
इतर बातम्या-