Awadhut Wagh | ‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फासावर लटकवा,’ भाजप नेत्याचे वादग्रस्त ट्विट

पंतप्रधान यांना सुरक्षा पुरवण्यास पंजाब सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील भाजप नेते अवधूत वाघ यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फासावर लटकावा अशी मागणी करणारं ट्विट केलंय. तसेच वादाला तोंड फुटू नये म्हणून त्यांनी हे ट्विट डिलीटदेखील केले. अवधूत वाघ यांच्या या ट्विटनंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Awadhut Wagh | 'पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फासावर लटकवा,' भाजप नेत्याचे वादग्रस्त ट्विट
awadhut wagh
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 7:33 AM

मुंबई : पंजाबच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिली. ते ज्या रस्त्यावरुन जात होते तेथे शेतकरी आंदोलक असल्यामुळे त्यांना रस्त्यावरच 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले. या प्रकारानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान यांना सुरक्षा पुरवण्यास पंजाब सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील भाजप नेते अवधूत वाघ यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फासावर लटकावा अशी मागणी करणारं ट्विट केलंय. तसेच वादाला तोंड फुटू नये म्हणून त्यांनी हे ट्विट डिलीटदेखील केले. अवधूत वाघ यांच्या या ट्विटनंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फासावर लटकवा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला. पंतप्रधान ज्या रस्त्यावरुन जात होते त्याच रस्त्यावर आंदोलक शेतकरी जमा झाले होते. त्यामुळे मोदी यांना जवळपास पंधरा ते वीस मिनिटे रस्त्यावरच थांबावे लागले. पुढे तर मोदी यांना आपला पंजाब दौराच रद्द करावा लागला. या सगळ्या प्रकरणासंदर्भात भाजपकडून काँग्रेसला लक्ष्य केले जात आहे. पंजाब सरकार तसेच पोलीस मोदींना सुरक्षा पुरवू शकले नाहीत. विकासविरोधी असल्याचं काँग्रेसनं दाखवून दिलं आहे, अशी टीका भाजपकडून केली जातेय. त्यानंतर भाजप नेते अवधूत वाघ यांनी मोठे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी अशी मागणी करणारं ट्विट केलंय. वाघ यांनी हे ट्विट नंतर डिलीट केलंय. मात्र वाघ यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या ट्विटमुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला थेट फासावर लटकवण्याची भाषा कितपत योग्य आहे, असे विचारले जात आहे.

अवधूत वाघ यांनी केलेले ट्विट

हे खूप चिंताजनक आहे- जे. पी. नड्डा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंधरा मिनिटे रस्त्यावर उभं राहावं लागल्यामुळे भाजपने काँग्रेसवर घणाघाती टीका केलीय. ‘पंजाब सरकारने दाखवून दिलं की ते विकासविरोधी आहेत आणि आपल्या स्वातंत्र्यसेनानींबद्दल त्यांच्या मनात आदर नाही. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक होती. हे खूप चिंताजनक आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचे सुपुत्र सरदार भगतसिंह आणि अन्य शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार होते. सोबतच राज्यातील प्रमुख विकासकामांचं भूमिपूजन ते करणार होते,’ अशी टीका भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली.

इतर बातम्या :

School Close : कोरोनाचं वाढतं संकट, सिंधुदुर्ग रत्नागिरीतही शाळा बंद; ऑनलाईन शिक्षण सुरु

‘नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला’, चंद्रकांत पाटलांचा इशारा

अर्थचक्रावर ‘ओमिक्रॉन’चं सावट: RBI व्याजदर ‘जैसे थे’? होम लोनचं काय होणार?

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.