AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसाने बोंबलू नये असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू
| Edited By: | Updated on: Oct 21, 2020 | 11:33 AM
Share

अमरावती : देशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कांद्यानेसुद्धा सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचण त्यात अस्मानी संकट आणि वाढलेली महागाई यामुळे नागिरक चिंतेत आहेत. अशातच ‘कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका. जर परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा’ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. (bacchu kadu statement on onion rate hike amravati news)

केंद्र सरकारने इराणमधून नुकताच कांदा आयात केल्याने संपूर्ण देशासह राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र, कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसाने बोंबलू नये असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तर कांदाचे भाव वाढले पाहिजे कारण 70 वर्षाचा अनुशेष आहे. ज्यांना कांदा परवडत नसेल त्यांनी मुळा, लसूण खावा असं बच्चू कडू म्हणालेत.

‘आता मीडियाने सुद्धा गृहिनीचं बजेट कोलमडलं असं सांगू नये’ ज्यांना असेही यावेळी कडू यांनी सांगितले. मात्र, हा कांदा शेतकऱ्यांचा नसून आयात केलेला कांदा आहे. मग आयात केलेल्या कांद्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल असा प्रश्न यावेळी त्यांनी विचारला आहे. (bacchu kadu statement on onion rate hike amravati news)

Gold Rate: सोनं महागलं, ऐन सणासुदीत चांदीही वधारली; पाहा आजचे दर

खरंतर, गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असताना आता सामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगरात कांद्याच्या किरकोळ दराने 70-90 रुपयांवर झेप घेतली, तर पुणे परिसरात तो 50 ते 70 रुपयांच्या घरात पोहोचला. राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास सामान्य लोकांच्या घरातील बजेट कोलमडू शकते.

नंदुरबारमध्ये बस ४० फूट खोल दरीत कोसळली; चौघांचा मृत्यू, 35 प्रवासी गंभीर जखमी

उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला असून अतिवृष्टामुळे खरिपाच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे नवीन पीक येण्यास विलंब लागेल. परिणामी देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी 705 टन कांद्याची आवक झाली असून घाऊक बाजारातच कांद्याचा प्रतिकिलो दर 40 ते 70 रूपयांवर जाऊन पोहोचला आहे.

(bacchu kadu statement on onion rate hike amravati news)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.