Eknath Shinde: पुढच्या निवडणुकीत 200 आमदार निवडून आणणार, हे सरकार बाळासाहेबांच्याच विचारांचं, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 20 मुद्दे

विधानसभा सभागृहात विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदन प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण केले. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे नेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे..  

Eknath Shinde: पुढच्या निवडणुकीत 200 आमदार निवडून आणणार, हे सरकार बाळासाहेबांच्याच विचारांचं, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 20 मुद्दे
पुढच्या निवडणुकीत २०० आमदार निवडून येणार Image Credit source: Vidhan sabha
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 4:29 PM

मुंबई– हे सरकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांच्या विचारांचं सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi)या सरकारला आशीर्वाद दिले आहेत. कोणतीही कमतरता पडू देणार नाही, असे मोदींनी सांगितल्याने त्यांनी सांगितले. या सरकारच्या पाठिशी अमित शाहा हे डोंगराप्रमाणे उभे आहेत,  असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी सांगितले. पुढच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे २०० आमदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही. घेतलेले निर्णय मागे घेणार नाही. राज्यातील सामान्य माणसांचे प्रश्न सुटतील, असे सरकार देऊ असे त्यांनी सांगितले.  विधानसभा सभागृहात विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदन प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण केले. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे नेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे..

  1.   मविआत वाईट वागणूक मिळाली. खच्चीकरण केलं म्हणून उठाव केल. गद्दारी केली नाही, तर उठाव केला आहे आम्ही. म्हणून एक दिवस ठरवून बाहेर पडलो.
  2. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचे मला फोन होते. कुठे चाललात, म्हटलं मला माहिती नाही. एकाही आमदाराने म्हटलं नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून जाऊया, हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. मग मी ठरवलं लढून शहीद झालो तरी चालेल मात्र मागे हटणार नाही. मी आमदारांना सांगितलं होतं काळजी करू नका, मी तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा निरोप घेईन असे मी सांगितलं. मी काय छोटीमोठी घटना नाही. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही जात नाही. हे का झालं याचा अभ्यास करायला हवा होता. एकिकडे चर्चा करायचे दुसरीकडे काढून टाकायचे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. माझ्या घरावर दगड मारायचे आदेश दिले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या घरावर दडग मारायची हिंमत कुणात नाही. जितेंद आव्हाडांना माहितीही माझ्या मागे किती लोक आहेत. ती डसून टाकतील.
  5. मी जावाचं रान केलंय. रक्ताचं पाणी केलंय. मी सतराव्या वर्षी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसैनिक झालो. मी वयाच्या अठराव्या वर्षी शाखाप्रमुख झालो. मी साहेबांना सांगितलं सिनिअर लोकांना पद द्या, तेव्हा त्यांनी मला एक शिवी घातली आणि शाखाप्रमुख बनवलं. मी कधी पदाची लालसा ठेवली नाही.
  6. आता आमचा बाप काढला. रेडा म्हणाले अनेक वाईट शब्द काढले. मी एकदम शांगत असतो. मात्र अन्याय झाल्यावर मला शांत राहता येत नाही. माझं काम केसरकरांनी हलकं केलं. त्यांना मी मीडियाला बोलायला सांगितलं. बाप काढले, माझे वडील जिवंत आहेत. माझी आई गेली, एकादा गावी गेल्यावर उद्धव साहेबांचा फोन आला. आईने उद्धव साहेबांना सांगितलं माझ्या बाळाला सांभाळा. तिच्यासाठी मी बाळ होतो. मला खूप कष्टाने वाढवलं आहे. हीच परिस्थिती माझ्या श्रीकांतसोबत झाली, माझा श्रीकांत डॉक्टर झाला मात्र मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी लेट यायचो आणि तो आधीच निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. मी शिवसैनिक हेच माझं कुटुंब मानलं.
  7. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला, माझी दोन मुलं डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघे साहेबांनी आधार दिला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कुणासाठी जगायचं. माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता होती. दिघे साहेब पाच, सहावेळा माझ्या घरी आलं. मी संघटनेला न्याय देऊ शकत नाही म्हणून सांगितलं. तेव्हा दिघे साहेब म्हणाले तुला हे दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसावेच लागतील. मी दिघे साहेबांना देव मानतो, बाळासाहेब, दिघेसाहेब आमचे देव मानतो. मला सभागृह नेता केला. जितेंद्र आव्हाड दुसऱ्या पक्षात होता तरी त्याला माहीत होतं एकनाथ शिंदे खूप वेड्यासारखं कामाला लागला आहे.
  8. सभागृह नेता झाल्यावर मी मागे वळून पाहिलं नाही. माझं सभागृह नेत्याचं दालन रात्री ११ वाजेपर्यंत उभं केलं. मी खूप मेहनत केली. त्यावेळी लेडीज बारचा सुळसुळाट होता. तेव्हा पैशाची उधळण सुरू होती. मी पोलिसांना अनेकदा पत्रं दिली. आयाबहिणी सांगायच्या संसार उद्ध्वस्त केल्या. १६ लेडीजबार मी तोडल्या. माझ्या विरोधात पिटीशन टाकली. त्यावेळी गँगवार होत होता. मला ठार मारण्याचा प्लॅन होता. तेव्हा आनंद दिघेंना सांगितलं. तेव्हा त्यांनी शेट्टी लोकांना बोलावलं आणि सांगितलं एकनाथ को कुछ हो गया तो समज जाव. मी शिवसेनेसाठी प्रचंड आंदोलन केलं. केसेस घेतल्या.
  9. दिघेंचा मृत्यू झाला. तेव्हा मी कोलमडून गेलो. तेव्हा लोकांचा उद्रेक झाला. हॉस्पिटल तोडलं. लोक बेभान झाले होते. मी तिथे नसतो तर सिलेंडर स्फोट होऊन शंभर एक लोक मेले असते. त्यावेळी शंभर लोकांना अटक झाली. तेव्हा पोलिसांना सांगितलं हा उद्रेक आहे. जाणूनबुजून केलेली कृती नाही. ठाण्यातून शिवसेना संपली असं वाटत होतं. बाळासाहेबांनाही तसं वाटत होतं. दिघेंच्या आशीर्वादाने आण्ही ठाणे पालघर जिल्हा राखला.
  10. तुम्ही म्हणाला एमएसआरडीचं खातं दिलं. चांगलं खातं द्यायचं होतं. पण ते खातं देण्याचं काम यांचं नव्हतं. समृद्धीचं काम फडणवीसांनी दिलं. माझे पुतळे जाळले गेले. एकदा तर विमान क्रॅश होता होता वाचलं. मोपलवार तर देवाचा धावा करत होता. विमानात बसलो पायलट सरदारजी होता. विमान खाली वर होत होतं. त्याने थंब केला होता. त्याला म्हटलं आता काय ढगात गेल्यावर करतो. तो म्हणाला, आधीच विमान अहमदाबादला लँड झालं. त्यामुळे ढगात घुसलो
  11. फडणवीस शिवसेना उपमुख्यमंत्रीपद देणार होते. गडकरी साहेब भिवंडीत आले होते. फडणवीस म्हणाले संधी चांगली मिळेल. मी काही रिअॅक्शन दिली नाही. ते पद आम्ही घेणारच नाही. कारण ते मला द्यावं लागेल म्हणून. मी रिअॅक्ट झालो नाही. मी गप्प झालो. मी एक पाश्वभूमी सांगितलं
  12. मला उपमुख्यमंत्री करणार होते. ही वस्तुस्थिती होती. पण अजितदादांनी कुणी सांगितलं शिंदे नको म्हणून. मी कोणत्याही पदाची लालसा केली नाही. करणार नाही. सुधीर जोशी मनोहर जोशी यांचा किस्सा होता. त्यावेळी ते म्हणाले ते अहो तो अपघात होता. त्यांना मी बाजूला घेऊन विचारलं. तेव्हा ते म्हणाले. आम्ही तुमच्या नावाला कधी विरोध केला नाही. तो तुमच्या पक्षाचा निर्णय होता.
  13. सावरकर आणि दाऊदसोबत असलेल्या माणसांसोबत काय भूमिका घ्यायची याबाबत संभ्रम होता. अशा मुद्द्यांवर शिवसेना म्हणून भूमिका घेऊन जाऊ शकतो.
  14. राज्यसभेत आमचे दोन येणार होते, आमची फिल्डिंग इन्टॅक्ट होती. तरीही उमेदवार पडला, आम्ही म्हटलं काय झालं. कसा काय पडला. तरीही पडला. यांनी काय फिरवलं माहित नाही.
  15. विधान परिषदेत मला बाजूलाच ठेवलं मात्र तरीही म्हटलं, निवडून आणू, नाहीतर गद्दार म्हणतील. तेव्हा साहेबांचा फोन आला. तेव्हा मी बाहेर होतो.
  16. ११५ त्यांचे आणि ५० आमचे १६५ आमचे. अजित पवार म्हणाले निवडून येणार नाहीत. मी सांगतो पुढच्या वेळी २०० जण निवडून आणीन. एकही ५० पैकी आमदार पडू देणार नाही. चिन्ह वगैरे सोडा शिवसैनिक आहे, लाथ मारीन तिथे पाणी काढीन. नाही निवडून आणले तर शेती करायला जाईन.
  17. बाळासाहेब काय म्हणाले होते, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाहीत. असे शिवसेनेत होऊ देणार नाहीतर, नाहीतर दुकान बंद करीन.
  18. संतोष बांगर यांनी रात्री दीड वाजता फोन केला. अजून तीन चार असे आहेत, मी म्हटलं आपल्याला काही खोटं करायचं नाही.
  19. भाजपा सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाईल, असे म्हणत होते. पण कुणाला काही अटक काही झाले का. हे जे आले आहेत, ते हिंदुत्वाचा विचाराने आले आहेत. त्यामुळे त्यांनी हा विचार केला. मुख्यमंत्रीपद दिले.
  20. शिवसेना-भाजपा वेगळा विचार केला असता तर अजित पवारांनी १०० चे टार्गेट ठेवले आहे. जयंत पाटील सगळीकडे सांगत होते की पुढचा आमदार राष्ट्रवादीचा होईल. सांगलीत एका माणसाला मोक्का लावला, सांगितलं वरिष्ठांना, पण ते म्हणाले डीजी म्हणतात. त्यांनी सांगायला हवे होते. शिवसेनेत सत्तेत काय मिळालं तडीपाऱ्या, वॉण्टेड, काय मिळालं शिवसेनेला
  21. सत्तेचा फायदा मूळ शिवसैनिकाला मिळाय़ला हवा होता. जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुखाला मिळायला हवा होता. आता सामान्य शिवसैनिकाला जेव्हा कळलं की आमची भूमिका बाळासाहेबांची आहे. त्यानंतर ते मनाने आमच्यासोबत आहे. त्यांना एफिडेविट देण्याची गरज नाही. अजून प्रयत्न केले नाहीत. तुम्ही अडकवून ठेवले आहे. रोज कोर्टात जातात आहात. आता हे जरा संपू दे, मग बघतो
  22. शिवसेनेत रक्तपात होऊ देणार नाही, एकनाथ शिंदे यांचे भास्कर जाधव यांना उत्तर आहे. माझ्यासोबत सगळे आहेत ते मुख्यमंत्री आहेत. कागदपत्रं नकोत, थेट कारवाई., फोन करुन. तरच २०० होणार आम्ही.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.